परमेश्वराचे अन तुमच्या आशीर्वादामुळे वाचलो, नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती

By : Polticalface Team ,16-01-2023

परमेश्वराचे अन तुमच्या आशीर्वादामुळे वाचलो, नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती बारामती : "तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती," असा जीवघेणा अनुभव विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते.

अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील पवईमाळ येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते पार पडले. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी शनिवारी (ता.14 जानेवारी) पुण्यात लिफ्टमध्ये अडकल्याचा जीवघेणा अनुभव आपल्या मिश्किल शैलीत सांगितला.

अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. पुणे येथील हर्डीकर हॉस्पिटलमध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर जाताना लिफ्ट बंद पडली आणि काही क्षणात लिफ्ट चालू होऊन काही कळायच्या आत थेट जमिनीवर आदळली. लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो नाहीतर आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता. मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही. अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. मात्र, आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहवलं नाही, असं म्हणत अजितदादांनी पुण्यातील प्रसंग बारामतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमोर कथन केला.

"काल वडिलांचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम असल्याने त्यांचा श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीला आलो. मात्र घडलेला प्रसंग मी सुनेत्राच्या कानावरही घातला नाही आणि कुटुंबियांनाही सांगितला नाही. प्रसंग बाका होता पण त्यातून आम्ही वाचलो, असेही अजितदादा म्हणाले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.