राष्ट्र उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठा वाटा!
मा. आ. राहूल जगताप.
By : Polticalface Team ,16-01-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी ) राष्ट्रीय सेवा योजना हे समविचारी ,समाज व राष्ट्र निष्ठा असणारे, विकासाचा ध्यास घेणारे महाविद्यालयीन युवकांचे संघटन आहे. हे संघटन विशिष्ट ध्येय , उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एकत्र येऊन परिश्रम घेते ,म्हणून राष्ट्राच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन मा.आ. राहूल जगताप यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे ,विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा यांचे संयुक्त विद्यमाने लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या विशेष हिवाळी श्रमसंस्कर शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के होते. यावेळी बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब थोरात, गणपतराव काकडे, सरपंच तुषार काकडे ,शिवाजीराव जाधव ,सुनील पाटील, रावसाहेब काकडे, पंढरीनाथ खंडागळे ,दळवी साहेब आदी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. म्हस्के यांनी सर्व स्वयंसेवक कार्यक्रम अधिकारी आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. या शिबिरातून श्रमाचे महत्त्व आणि श्रमसंस्कार यामुळे माणसं जोडली गेली याची दखल ग्रामस्थांनी घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना श्री.बाळासाहेब नाहटा यांनी शिबिरार्थींचे मनापासून आभार व्यक्त केलेच, शिवाय स्वच्छतेतून स्मशानभूमीला मंदिराचे रूप दिले याचा आवर्जून उल्लेख केला.
दि.०९ जानेवारी २०२३ ते १५ जानेवारी २०२३ या सात दिवसीय शिबिरात शंभर स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. ग्राम स्वच्छता, समाज प्रबोधनपर पथनाट्य, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन ,स्मशानभूमीचे सुशोभीकरण, वनराई बंधारा इत्यादी उपक्रम राबविले गेले. याशिवाय या शिबिरात डॉ.अरुण रोडे, प्रा. मधुकर खोमणे, विजय माळी, हेमंत नरसाळे, प्रा.नवनाथ शिंदे ,डॉ. प्रकाश साळवे, सस्ते सर आदी तज्ञ व्याख्यात्यांची वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यक्रमअधिकारी प्रा. रमेश थोरात यांनी केले ,तर प्रा. भाऊसाहेब बुलाखे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रम अधिकारी डॉ.देवेंद्र बहिरम,डॉ.सुप्रिया पवार प्रा.दिलावर पठाण, यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. डॉ.राहुल गायकवाड,प्रा. जंजाळ मॅडम, शेख मॅडम आणि ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.
-----------------------------------------
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी