यवत ग्रामपंचायतीची विषेश ग्रामसभा स्थकुप, तर ओढ्यातील दुषित पाणी दुर्गंधीने नागरिक त्रस्त, ओढा बंदीस्त करण्याची होतेय मागणी

By : Polticalface Team ,16-01-2023

यवत ग्रामपंचायतीची विषेश ग्रामसभा स्थकुप, तर ओढ्यातील दुषित पाणी दुर्गंधीने नागरिक त्रस्त, ओढा बंदीस्त करण्याची होतेय मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १६ जानेवारी २०२३, दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पालखी स्थळ या ठिकाणी निषेध ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोरम अभावी, सरपंच समीर दोरगे यांच्या आदेशानुसार ग्रामसभा स्थकुप करण्यात आली, अजिंठा वरील विविध विषया संदर्भात कोणतीही चर्चा होऊ शकली नाही, या वेळी उपसरपंच सुभाष यादव, सदस्य व माजी उपसरपंच नाथदेव दोरगे, सदस्य इब्रानभाई तांबोळी, गौरव दोरगे, व इतर अनेक महिला सदस्य, तसेच ग्राम विकास अधिकारी बबन चखाले, आणि काही ग्रामस्थ उपस्थित होते. यवत गावठाणातील महत्वाचा चर्चेत असलेला विषय, गावठाणातील ओढ्यात दुषित पाण्याचा प्रादुर्भाव वाढल्याने व दुर्गंधीने नागरिक त्रस्त या बाबत विषश ग्रामसभेत चर्चा होणे अपेक्षित होते, हजरत बडेशावली बाबा दर्गा, ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराच्या मागे बाजार मैदानातुन मशानभुमी पर्यंत ओढ्यातील सांड पाणी व मैल दुषित पाण्याचा निचरा थांबला आहे, त्यामुळे या परीसरातील धार्मिक स्थळावर आलेल्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली, या संदर्भात यवत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांना विचारले असता, म्हणाले काही दिवसात या सर्व समस्याचे निराकरण होईल, मैल निर्मूलन प्रक्रिया प्रोजेक्टसाठी निधी उपलब्ध झाला असुन लवकरच काम हाती घेतले जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच, सदानंद दोरगे, बोलताना म्हणाले गावातील ओढ्यात सर्वच नागरिक शौचालयाचे दूषित पाणी सोडत आहेत कॅनल पासून ते स्मशानभूमी पर्यंत ओढा बंदीस्त करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, गावातील विविध भागातुन सांड पाणी व शौचालयाचे दूषित पाणी ओढ्यामध्ये सोडले जात आहे, गावठाणातील ओढ्या बंदोबस्त बांधकाम करण्याची मागणी सदानंद दोरगे यांनी केली आहे.

आनंद ग्राम ग्रह सोसायटी व साव्हिल ग्रह सोसायटीच्या संचालक मंडळाने त्यांच्या मर्यादित मैल निर्मूलन प्रक्रिया करून दूषित ड्रेनेज लाईन करून सांडपाण्याची ओढ्यात सोडावे अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे, पुर्वी कॅनोलचे पाणी गळती व पाझर होता त्यामुळे ओढ्याचे पाणी वाहून जात असे, मात्र काही दिवसांपूर्वी कालव्यातील सिमेंट काँक्रेट अस्तरीकरण झाल्याने पाण्याची गळती बंद झाली असल्याने ओढ्याचे पाणी वाहने थांबले आहे, त्यामुळे सांड पाणी व मैल दुषित पाण्याचा निचरा थांबला आहे, अशी प्रतिक्रिया विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच नाथदेव दोरगे यांनी व्यक्त केली आहे, यवत गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा काही दिवसात होणार आहे, यात्रेला आलेल्या पै पाहुणे यांनी यात्रेचा आनंद घ्यायचा की ओढ्यातील दुर्गंधीचा आदर्श, ? असा सवाल गावातील ग्रामस्थ महादेव दोरगे यांनी उपस्थित केला आहे, आनंदग्राम ग्रह सोसायटीचे ड्रेनेज पाईपलाईन ओढ्यात सोडण्यात आले असल्याचे आनंदग्राम गृह सोसायटीचे सचिव अँड सोळंकी,व संचालक डॉ, संतोष बडेकर यांनी सांगितले, यवत गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी होत असते.

यात्रेतील आकर्षित मनोरंजन म्हणजे लोकनाट्य तमाशा आकर्षित उंच पाळणे, पन्नालाल झूठ ना बोले, मौत का कुवा, विविध प्रकारचे आकर्षित बाजार पेठ या ओढ्याच्या लगत पूर्वीपासून होत आहेत, कॅनलच्या अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती बंद झाली असल्याने ओढ्याचे वाहते सांड व दुषित पाण्याचे ठिक ठिकाणी ढव साठले असल्याने परीसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे गावातील व मंदिर परिसरातील भाविक व नागरिक या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत, यवत ग्रामपंचायतीचे या संदर्भात दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे, गावातील ओढ्याची स्वच्छता सुरू करण्यात यावी अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

यवत गावठाणातील हजरत बडेशावली बाबा दर्गा,पुणे सोलापूर महामार्गा खालुन श्री भैरवनाथ मंदिर ते मशानभुमी पर्यंत ओढ्यातील स्वच्छता ग्रामपंचायतीने तत्काळ करावी, व मैल निर्मूलन प्रक्रिया बाबत तत्काळ निर्णय घेण्यात यावा अशी नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष