ती धमकी नाही, पैलवानांना विचारण्याचा हक्क, पैलवान सिकंदर शेखने दिलं स्पष्टीकरण

By : Polticalface Team ,17-01-2023

ती धमकी नाही, पैलवानांना विचारण्याचा हक्क, पैलवान सिकंदर शेखने दिलं स्पष्टीकरण पुणे : पोलिस नाईकाकडून ती धमकी नसून जाब विचारण्यात आल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सेमीफायनमध्ये पराभूत झालेला पैलवान सिकंदर शेख याने दिलंय. कुस्तीत जे गुण पंचांनी दोन्ही मल्लांना दिले आहेत, ते चुकीचं असल्याचा आरोपही सिकंदरने यावेळी केला आहे

महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनल सामन्यात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखमध्ये कुस्ती झाली. यावेळी महेंद्रला जास्त पॉईंट मिळाल्यामुळे सिकंदरचा पराभव झाला. मात्र महेंद्रला जे पॉंइट मिळाले त्यावर सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यावर आता स्वत: सिकंदर शेखने आपली कैफियत मांडलीय.

सिकंदर म्हणाला, सोशल मीडीयावर जे तुम्ही सर्वांनी पाहिलंय ते खरं आहे. जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. जिथं दोन पॉइंट दिले पाहिजे होते तिथे पंचांकडून चार पॉइंट देण्यात आले आहेत. चार पॉइंट देण्याचा काहीच प्रश्न येत नाही. त्यावेळी पंचांनी मला पुढचा कॅमेरा दाखवला, त्यांनी मागील बाजूचा कॅमेरा दाखवला नसल्याचा आरोपही केला आहे. तसेच आमचा कोच त्या ठिकाणी आला तर त्यांना हाकलून दिल्याचंही सिकंदरने सांगितलंय.

जे काही घडलंय ते चुकीचं असून त्या प्रकरणी माझ्यावर प्रेम करणारे लोकं जाब विचारत आहेत. त्यावेळी पंचांनी माझे चार आणि प्रतिस्पर्धी मल्लाचे दोन पॉइंट दिल्याचं सिंकदरकडून सांगण्यात येतंय. या संपूर्ण प्रकरणावर पंचांना एका पोलिस शिपायाकडून जाब विचारण्यात आला आहे. ही धमकी नसून जाब विचारला आहे. पोलिस नाईक आणि पंचांसोबत बोलणं झाल्याची कॉल रेकॉर्डींग मी ऐकली असून ती धमकी नाही. तसेच मी आत्तापर्यंत थकलेलो नाही अन् यापुढेही मी थांबणार नाही, असं पैलवान सिंकदर शेख यांनी सांगितलंय.

zum रेकॉर्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी नसून माझ्यावर प्रेम करणारी लोकं त्यांना असं का केलं विचारत आहेत. दरम्यान, त्यांनी जर विचारलं नाहीतर यापुढील काळातही असंच घडत राहणार असल्याचंही सिकंदरने स्पष्ट केलंय. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख प्रबळ दावेदार मानला जात होता, पण महेंद्रला जास्त पॉईंट मिळाल्यामुळे सिकंदरचा पराभव झाला. सेमी फायनलमध्ये महेंद्रकडून पराभूत झालेल्या सिकंदर शेखची सध्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी