यवत स्टेशन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची बदली तर यवत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची नियुक्ती

By : Polticalface Team ,20-01-2023

यवत स्टेशन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची बदली तर यवत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची नियुक्ती दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता २० जानेवारी २०२३ जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत गुरुवार दि १९ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा अंतर्गत पोलिस अधिकाऱ्यांची बदली व पदस्थापना करण्यासाठी जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक संपन्न झाली.
आयोजित बैठकीमध्ये जिल्हा आस्थापना मंडळाने संबंधित पोलिस अधिकारी यांचे जनहित लक्षात घेऊन निवड करण्यात आली, त्यामध्ये दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची बदली झाली असुन, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची यवत पोलीस स्टेशन येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना दौंड शहरातील तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने दौंड पोलीस ठाण्यात तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला होता, जिल्हा आस्थापना मंडळाच्या बैठकीत दौंड पोलीस स्टेशन येथे भाऊसाहेब पाटील यांची नियमित पदस्थापना नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्हा अंतर्गत विविध क्षेत्रातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन परिपत्रक काढण्यात आली आहे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण विनायक पवार, यांची बदली जुन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, त्यांनी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सामान्य माणसाला पोलीस स्टेशन संदर्भात आस्था निर्माण करुन दिली सर्वसामान्य नागरिकांची पोलीस स्टेशनला नाळ जोडण्याचा संदेश दिला, यवत पोलीस स्टेशन येथे चांगल्या प्रकारे कामकाज केले आहे, राजकीय क्षेत्रातील गाव राडा करणारे कार्यकर्ते, गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील आर्थिक परिस्थितीला बळी पडलेल्या माणसाला सावकारी कायद्याबाबत कायद्या संदर्भात जनजागृती केली तसेच महिलांवरील होणारे अंन्याय अत्याचाराचे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न केले, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी दरोडा लुटमारी करणाऱ्या टोळ्या तसेच गाव दक्षता समिती स्थापन करण्यात त्यांनी ग्रामीण भागातील तरुण युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, या त्यांच्या नागरिक हितार्थ केलेल्या कामगिरीचे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी