दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने तहसीलदार पाटिल यांना निवेदन, राज्यात स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी

By : Polticalface Team ,22-01-2023

दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने तहसीलदार पाटिल यांना निवेदन,  राज्यात स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२२ जानेवारी २०२३, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील ओबीसी मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी दि,१९ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आली आहे, दौंड तालुका नायब तहसीलदार अजित दिवटे यांनी निवेदन स्वीकारले आहे, या प्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन शिंदे, ओबीसी नेते महेश अण्णा भागवत, समता परिषदेचे अध्यक्ष सचिन रंधवे, उपअध्यक्ष विक्रांत खताळ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, राज्यातील ओबीसी व इतर मागासवर्गीय यांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी दौंड तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नुकतीच बिहार राज्यमध्ये स्वतंत्र पणे जातनिहाय जनगणना सुरु झाली असून. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना सुरू केल्या आहेत, तसेच महाराष्ट्र राज्यात तत्पूर्वी ओबीसी जातनिहाय जनगणना करण्या बाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मागणी केली होती, ओबीसी जनगणना हा विषय केंद्र सरकार संबंधित आहे. मात्र ओबीसी इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यास केंद्र सरकार असमर्थ असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकार प्रमाणे ओबीसीं स्वतंत्र जनगणना करावी.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
देशातील अनुसुचित जाती जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षांचा कालावधी होत आहे, स्वातंत्र्या नंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले होते. ओबीसी मागासवर्गीय वंचित राहिले आहेत. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते तत्कालीन राज्य सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले होते. तसेच दि,५ मे २०१० रोजी नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व.गोपीनाथ मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला होता. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे,
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेल संघटनेच्या वतीने जोरदार मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, सचिन डेंबळकर संतोष चव्हाण, सरचिटणीस ओबीसी सेल, अमोल होले, उमेश म्हेत्रे, गोरख फुलारी, निलेश बनकर, डॉ दत्तात्रय जगताप,भारत भुजबळ, समता परिषद महिला अध्यक्षा आक्ष्लेषा शेलार, कुरकुंभ सरपंच जयश्रीताई भागवत, जिजाऊ ब्रिगेड महिला अध्यक्षा सारिका भुजबळ, सिमा गायकवाड, प्रांजल साळुंखे, राजश्री दोरगे, स्वातीताई जगताप, सोनाली काळे, या महिला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष