श्रीगोंदा शहरात शिव शंकर व वात्सल्य मुर्तीची प्रतिस्थापना
By : Polticalface Team ,22-01-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील शनी मंदिरात आज पौष आमावस्ये निमित्त मंदिराच्या प्रवेशद्वारा शेजारी शंकर व वात्सल्य मुर्तीची प्रतिस्थापना ह.भ.प.भुषण महाराज महापुरूष यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते, भगवंत वाळके यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पुर्व बाजुस वात्सल्य मुर्ती मा.आ.राहुल जगताप यांच्या वतीने अर्पण करण्यात आली तर पश्चिमेस श्री शंकराची मुर्ती दादासाहेब बबन कोथिंबिरे यांनी अर्पण केली. मंदिरावरील एलईडी लाईट बोर्ड कैलास गंगाधर काळे यांच्या वतीने अर्पण करण्यात आले.
शनिवारी पौष आमावस्ये निमित्त हजारो भाविकांनी शनीचे दर्शन घेतले, दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. होती.
शनिमारुती देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष राणा खेतमाळीस यांनी या देवस्थान च्या अध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतल्या नंतर त्यांचे वडील स्व. सोपानराव खेतमाळीस यांच्या प्रमाणेच या देवस्थान च्या विकासासाठी देवस्थानचे विश्वस्त कैलास गंगाधर काळे यांना सोबत घेत सर्व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कार्य पार पाडत आहेत.
वाचक क्रमांक :