जय जवान जय किसान सेवाभावी संस्थेच्या वतीने गुंडेगाव मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,22-01-2023

जय जवान जय किसान सेवाभावी संस्थेच्या वतीने गुंडेगाव मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न अहमदनगर : गुंडेगाव मध्ये जय जवान जय किसान सेवाभावी संस्था च्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जय जवान जय किसान संस्थेचे मार्गदर्शक आदर्श पोलीस अनिल हराळ हे उपस्थित होते भविष्यात महिलांना संस्थेच्या वतीने रोजगार उपलब्ध करून देणार असून महिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जय जवान जय किसान सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक अनिल हराळ साहेब यांच्या अनुभवा चा उपयोग करून घेऊ असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव कविता अनिल हराळ यांनी केले जय जवान जय किसान सेवाभावी संस्था च्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमात मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या हळदीकुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्‍या जिवासाठी कार्य करते. हळदीकुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय.हळदीकुंकवाच्या माध्यमातून जीव एकप्रकारे दुसर्‍या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो.कुंकवाच्या उगमाचा इतिहास धूसर आहे. मातृप्रधान संस्कृतीत शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबळीचा रक्ताचा टिळा लावला जाई त्यावरून कुंकवाची प्रथा आलेली दिसते. स्त्री ही जगदंबेची अंशरूप मानली गेल्याने जेव्हा स्त्री घरामध्ये गृहलक्ष्मी म्हणून येते तेव्हा पशुबळी देऊन त्याच्या रक्ताचा टिळा लावूनच तिने गृहप्रवेश करायचा अशी प्रथा दक्षिणेतील काही आय्रेतर समुदायात प्रचलित होती व आजही काही आदिवासी जमातीत त्या प्रथेचे अवशेष आढळतात. तंत्र / संत वाङ्मयात कुंकुमतिलकाला विशेष महत्त्व आहे. कुंकू हे सौभाग्यप्रतीक, ही द्रविड स्त्रियांमधील प्रथा भारतात इतरत्र आठव्या शतकानंतर प्रचलित झालेली दिसते. कुंकू हे स्त्रियांचं सौभाग्य लेणं आणि नवरा गमावण्याचं दुर्भाग्य जिच्या नशिबी येतं, अशा विधवेने कपाळी कुंकू लावणं निषिद्ध ठरवलं गेलं. सुवासिनीला सुवासिनीनेच कुंकू लावायचं आणि कुंकू लेणाऱ्या सौभाग्यवतीला फक्त सणासमारंभात, पूजाअच्रेत, समाजात स्थान! विधवेला स्थान नाही. ती दळभद्री, नवऱ्याच्या मुळावर आलेली म्हणून अशुभ, अपशकुनी मानली जाऊ लागली. स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता मानववंशाचं सातत्य टिकवण्यासाठी कळीची असते. आदिम समाजात त्यामुळे स्त्रीला महत्त्वाचं स्थान होतं यावेळी जयश्री कुताळ, छाया कुताळ, लता कुताळ, सुलोचना हराळ, नवनाथ कुताल , बाळासाहेब कुताळ,जयश्री कुताल ग्रामपंचायत सदस्य गुंडेगाव. छाया कुताल माजी ग्रामपंचायत सदस्य. कविता कुताल. जया सचिन कुताल. जालिंदर कुताल. शितल कुताल. कोमल कुताल. रेखा कुताल. सारिखा कुताल .भानुदास कुताळ, सचिन कुताळ यांच्या सह कुताल मळा गुंडेगाव येथील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष