श्रीगोंद्यात आंतराष्ट्रीय स्कुल चे कार्यालय आज पासून खुले - शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा.
By : Polticalface Team ,22-01-2023
श्रीगोंदा - येथे तिरूपती चॅरिटेबल फाऊंडेशन अंतर्गत श्रीगोंदा शहरातील वडाळी रोडवर आंतरराष्ट्रीय व्यंकटेश पोदार लर्न स्कूल लवकरच सुरू होत आहे . विद्यार्थी प्रवेश कार्यालयाचे उद्घाटन दि . २२ जानेवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती तिरुपती फाऊंडेशनचे अध्यक्ष नवनीत मुनोत, उपाध्यक्ष अतुल बगाड़े, डॉ . अनुप बगाडे , राहुल कोठारी व हितेश मुथा यांनी दिली , प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार संस्थेच्या विश्वस्तांनी म्हटले आहे की , वडाळी रोडवर व्यंकटेश अद्यावत इमारतीचे काम अंतिम टप्यात आले आहे . पहिल्या वर्षी प्ले ग्रुप ते सी . बी . एस . सी . पॅटर्न अंतर्गत वर्ग सुरू करण्यात येणार आहे . सुमारे सहाशे विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था होण्यासाठी २७ क्लासरुम संगणक प्रशिक्षण कक्ष तसेच खेळाचे मैदान तयार करण्यात आले आहे . या शाळेत कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता माफक दरात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची दारे खुली करून दिली जातील . श्रीगोंद्याच्या शैक्षणिक शिरपेचात मनाचा तुरा रोवण्याचे काम येथे होईल पोदार लर्न स्कूल च्या सहावी पर्यंतचे असा आम्हास विश्वास आहे . पोदार मॅनेजमेंट नुसार तज्ञ शिक्षक इतर कर्मचारी वर्ग नेमण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे विश्वस्तांनी म्हटले आहे .
वाचक क्रमांक :