शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा तालुक्यातील हजारो लोकांनी घेतला लाभ

By : Polticalface Team ,23-01-2023

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा तालुक्यातील हजारो लोकांनी घेतला लाभ 
लिंपणगाव (प्रतिनिधी)- ६ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी व शहरा मध्ये यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.

या मोफत शिबिरामध्ये सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, ऍसिडिटी, इत्यादी रोगांची मोफत तपासणी करण्यात आली व मोफत औषधे वाटण्यात आली. मोफत डोळ्याची तपासणी व फक्त ₹२०० रुपये नाममात्र शुल्क देऊन चांगल्या क्वालिटीचा चष्मा वाटप हे या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले.

श्रीगोंदा तालुक्यातील इतर प्रबळ पक्ष व मोठमोठ्या साखर सम्राटांना शिक्षण सम्राट दूध सम्राट व इतर मातब्बरांना प्रस्थापित पुढाऱ्यांना जे जमले नाही ते शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या करून दाखवले याबद्दल संपूर्ण तालुक्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. या आरोग्य शिबिरामध्ये ठाणे लोक कल्याण आरोग्य केंद्राच्या सर्व डॉक्टर मंडळींनी श्रीगोंदा तालुक्यात रुग्ण सेवा केल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

या शिबिराचा लाभ श्रीगोंदा तालुक्यातील तब्बल ९८७५ लोकांनी घेतला व ४५३८ लोकांना अतिशय चांगल्या प्रतीचे चष्मे वाटण्यात आले. लाभ घेतलेल्या रुग्णांची गावनिहाय संख्या पुढील प्रमाणे: आढळगाव कोकणगाव हिरडगाव भावडी तांदळी दुमाला (६९८), घोटवी घारगाव (५०९), कोथुळ ढोरजा भानगाव ( ५८८ ), श्रीगोंदा शहर छत्रपती शिवाजी महाराज चौक( ६६०), वडाळी सुरडी पारगाव(५७९), कोळगाव सुरेगाव कोरेगाव (७८९ ), चिखलठाणवाडी कणसेवाडी (४७९ ), पेडगाव शेडगाव (५९९), चांडगाव टाकळी कडेवळीत घोडेगाव हिरडगाव फाटा (५७५), ढवळगाव देवदैठण युवती राजापूर उक्कडगाव(५९९), श्रीगोंदा शहर अण्णाभाऊ साठे चौक बाजारतळ (७७५), कामठी मांडवगण वलघुड खांडगाव बांगर्डे(५७५), चोराचीवाडी भिंगान अधोरेवाडी वेळू(५४९), बेलवंडी कोठार देऊळगाव घुगलवडगाव (५७७), श्रीगोंदा शहर शनी चौक (८८५), मढेवडगाव बाबुर्डी चिंभळा पिंपरी(४४६) वरील गावामध्ये हे शिबिर राबविण्यात आले.

हे आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पुढील पदाधिकारी व शिवसैनिकांचे मोलाचे सहकार्य लाभले: सुरेश देशमुख, निलेश साळुंके, संतोष खेतमाळीस, रावसाहेब डांगे, रघुनाथ सूर्यवंशी, प्रवीण खेतमाळीस, नूतन ताई पानसरे, देवेंद्र डांगे, गणेश लाटे, बाळासाहेब शिंदे, नितीन शिंदे, अनिकेत मांडे, संभाजी घोडके, रोहिदास मस्के, कृष्णा भालेराव, चिमणराव बाराहाते, सुदाम सावंत, मारुती सुंबे, अविनाश दिवटे, चंद्रकांत धोत्रे, नितीन लोखंडे, सुनील शिंदे, राजू तोरडे, देविदास तोरडे, बाळासाहेब जगदाळे, सागर खेडकर, ओमकार शिंदे, महेश पोळ, संतोष चिकलठाणे, अर्पणा चिकलठाणे, शिवाजी राऊत, शिवाजी समदडे, हरिभाऊ काळे, प्रशांत चोर, जनाबाई गायकवाड, जमीर भाई शेख, दादासाहेब मुंडेकरी, संदीप शिंदे, संदीप साठे, राहुल नवले, शिवाजी दांगडे, अमर भोसले, मुकुंदराज चोर, सागर साळुंके, संभाजी पाचपुते, रघुनाथ सपकाळ, अण्णासाहेब जगताप, मयूर भोसले, सुदाम मखरे रंगनाथ डाळिंबकर जावेद फकीर शरद नागवडे अनिकेत परदेशी संकेत सांगळे संदीप साबळे योगेश भुतकर योगेश डांगे हनुमंत लाटे संजय लाटे विजय सावंत गणेश कुटे रामदास लोखंडे इत्यादी. वरील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व श्रीगोंदा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रचंड कष्ट आणि मेहनत घेण्यात आली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.