लिंबु प्रक्रिया उद्योगाशिवाय लिंबू उत्पादक शेतकर्यांना न्याय देता येणे अशक्य.
By : Polticalface Team ,25-01-2023
श्रीगोंदा (प्रतिनिधी)
अस्तित्व फाऊंडेशन, लिंबू उत्पादक शेतकरी ग्रुप आणि तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आजच्या कार्यशाळेत लिंबु लागवड फळपिके उत्पादन यावर आधारीत सविस्तर माहिती डाॅ.प्रमोद पाचणकर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिली तसेच लिंबु रोग व त्यावरील उपाय प्रा.मधुकर शेटे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सविस्तर दिली तसेच किटक घातक आणि उपयोगी यांची सविस्तर माहिती डॉ.रणजीत कडु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सविस्तर माहिती दिली तसेच बहार व्यवस्थापन आणि निर्यातक्षम लिंबु उत्पादन व विक्री यावर सविस्तर माहिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते कृषी रमेश हिरवे साहेब यांनी सांगितली तर सध्या लिंबु दराबाबत चाललेल्या परिस्थिती आणि आता चाललेला लिंबू व्यापार यावर कडक शब्दात ताशेरे ओढले .तसेच लिंबु प्रक्रिया उद्योगाशिवाय गत्यंतर नाही येत्या २६/०१/२०२३ पासुन लिंबु उत्पादक शेतकर्यांनी शेअर्स घ्यावेत व आपला तालुका लिंबु हब म्हणून ओळखला जावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आव्हान गोरख आळेकर यांनी केले. प्रास्तावना दरेकर साहेब यांनी केले तर सुत्रसंचलन लिला मॅडम यांनी केले तर आभार कृषी सहायक आरू मॅडम यांनी केले .हा कार्यक्रम नक्षत्र मंगल कार्यालयात पार पडला.
वाचक क्रमांक :