यवत पोलीस स्टेशन हद्दीत भिमा नदीपात्रात मिळालेल्या ७ मृतदेहाचे खून झाल्याचे उघड

By : Polticalface Team ,25-01-2023

यवत पोलीस स्टेशन हद्दीत भिमा नदीपात्रात मिळालेल्या ७ मृतदेहाचे खून झाल्याचे उघड दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, यवत पोलीस स्टेशन स्टेशन समीत मौजे पारगाव गावचे हद्दीत असणारे ब्रिजचे पूर्वेस | | भिमा नदी पात्रात १८/०१/२०२३ ते २२/०१/२०२३ रोजी पर्यत एकूण ०७ मृतदेह मिळून आलेले होते.
सदर मयतामधील अनोळखी मयत इसमाचे नातेवाईक यांचा शोध यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग पुणे ग्रामीण हे करीत होते. त्यापैकी दिनांक २०/०१/२०२३ रोजी नदीपात्रात मिळालेल्या एक मयत महिलेजवळ मोबाईल फोन सापडला त्यावरून यातील मयताचे नातेवाईकांचा शोध घेऊन नातेवाईक यांना मिळाले मृत महिलेचे व इसमाचे फोटो चिजवस्तु दाखवून मयत इसमाची ओळख पटविण्यात आली.


ओळख पटलेले मयत इसमांची नावे खालील प्रमाणे
1) मोहन उत्तम पवार, वय ४५ वर्षे, रा. खामगाव ता गेवराई जि. बिड (पती)
२) संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार, वय ४०रा. खामगाव ता गेवराई जि. बिड (पत्नी )
3) राणी शाम फलवरे , वय २४ वर्षे, राहणार हातोला, ता. वाशी जि. उस्मानाबाद (विवाहीत मुलगी)
4) शाम पंडीत फुलवरे, वय २८ वर्षे, राहणार हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद (जावई)
5)रितेश उर्फ भैया शाम फलवर वय ०७ राहणार हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद( नातू )
6)छोटू शाम फलवरे वय ५ वर्षे, राहणार हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद (नातू)
(७)कृष्णा शाम फलवरे व ०३ वर्षे राहतो, वाशी, जि. उस्मानाबाद (नातू)
मिळालेल्या माहीतीनुसार मोहन पवार है पत्नी संगिता उर्फ शहाबाई, मुलगी राणी, जावई शाम, नातू रितेश, छोटु कृष्णा यांचेसह व मुलगा अनिल यांचेसह मागील १ वर्षापासून पारनेर येथे राहुन मजुरी काम करीत होते.

पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असणारे अकस्मात मयताचे तपासादरम्यान काही पुरावे समोर आले त्यात असे निदर्शनास आले की सर्वांची हत्या करण्यात आलेली आहे. त्याअनुशंगाने यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८३/२०२३ भाविक ३०२, १२० (ख), ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हयातील आरोपी नामे १) अशोक कल्याण पवार, वय ३९ वर्षे २) शाम कल्याण पवार, वय ३५ वर्षे, ३) शंकर कल्याण पवार, वय ३७ वर्षे, ४) प्रकाश कल्याण पवार, वय २४ ५) कांताबाई सर्जेराव जाधव, वय ४५ वर्षे सर्व रा. ढवळेमळा निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरील सर्व व्यक्ती या मृतकाचे नातेवाईक आहेत. आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये आरोपी अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपूर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यु झाला होता त्या मृत्युमध्ये मृतक मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार जबाबदार आहेत असा आरोपीना संशय होता आणि त्याचा राग मनात होता त्या कारणावरून बदला घेण्यासाठी त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे असे प्रथमदर्शनी समोर आले आहे सदर गुन्हयाचे अनुशंगाने पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल घस हे करीत आहेत

सदर मयताबाबत तपास करण्याकरीता मा. पोलीस अशोक श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी, दौड विभाग श्री. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली स्था.गु.शा. पुणे ग्रामीण येथील पो.स. ई. गणेश जगदाळे, पी. स. ई. शिवाजी ननवरे, महा फौज तपार पंदारे, हनुमत पासलकर, मुकुट कदम, काशीनाथ राजापुरे, सचिन घाडगे, राजु मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, पो. ना.निलेश शिंदे , पो. कॉ. धीरज जाधव , मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेडगे, दगडु विरकर, अक्षय सुपे, पो. स. ई. संजय नागरगोजे, पो.. हवा . निलेश कदम, महेंद्र चांदणे, पो.हवा रामदास जगताप, पो.हवा. अक्षय यादव, पो.ना. अजित काळे, प्रमोद गायकवाड,पीएसआय गंम्पले, एपीआय केशव वाबळे, पीएसआय गवळी, यवत पो स्टे यांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आलेले होते त्यानी सदरचा गुन्हा उपडकीस आणलेला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष