भांडगाव येथील कापरे आणि दोरगे पाटील यांनी,जोपासली पूर्वजांची परंपरा, वधू वरांच्या हस्ते, ५१ हजार स्नेहवन संस्थेला देणगी स्वरूपात दिले दान

By : Polticalface Team ,26-01-2023

भांडगाव येथील कापरे आणि दोरगे पाटील यांनी,जोपासली पूर्वजांची परंपरा, वधू वरांच्या हस्ते, ५१ हजार स्नेहवन संस्थेला देणगी स्वरूपात दिले दान दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२६ जानेवारी २०२३ रोजी दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील कापरे आणि दोरगे पाटील,यांनी कै नितीन यशवंत कापरे यांच्या स्मरणार्थ, वधू-वरांच्या हस्ते स्नेहवन सामाजिक संस्थेला ५१ हजार रुपये देणगी स्वरूपात दान देऊन लग्न सोहळ्यास प्रारंभ केला, दि,२६ जानेवारी २०२३ रोजी यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील, समृद्धी गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी कापरे आणि दोरगे पाटील, परिवारातील, चि सौ कां माधुरी आणि चि निखिल यांचा शुभविवाह संपन्न झाला, भांडगाव येथील कै,नितीन यशवंत कापरे यांची जेष्ठ कन्या,चि,सौ,कां, माधुरी,आणि श्री सदाशिव पुंडलिक दोरगे पाटील,रा,भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे,यांचे कनिष्ठ चिरंजीव, निखिल यांच्या शुभविवाह प्रसंगी स्नेहवन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मा अशोक देशमाने यांना चिं सौ कां माधुरी,आणि चिं निखिल,यांच्या हस्ते ५१ हजार रुपये देणगी स्वरूपात दान देण्यात आले, भांडगाव पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते मा,शामराव यशवंत कापरे यांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला, गेली अनेक वर्षापासून भांडगाव पंचक्रोशीत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम, भांडगाव पंचक्रोशीत सामाजिक कार्यकर्ते शाम कापरे हे राबवित असताना दिसत आहेत, रक्तदान शिबिर, शाळेतील मुलांना सायकल वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात निष्ठेने कार्यरत आहेत, समाजातील उनीव ओळखून उपयोगी कार्यात सक्रिय असणारे शाम कापरे यांची महत्वपूर्ण भूमिका दिसुन येते, त्यांचे मोठे बंधू कै,नितीन यशवंत कापरे यांची जेष्ठ कन्या चि सौ कां,माधुरी, हिच्या शुभविवाह प्रसंगी हा आगळा वेगळा सत्कार्यीचा उपक्रम त्यांनी पुढाकार घेऊन,पंचक्रोशीतील समाज बांधवांना दिशा देणारा ठरला आहे, समाजातील कार्यास पाहुणचार मान सन्मान सत्कार श्रीफळ पुष्पगुच्छ, शाल फेटे, फटाक्यांची जोरदार आतिषबाजी अशा आनंदाच्या क्षणी अनेक वर्षापासून समाज बांधवांनी आपली संस्कृती जपली आहे, मात्र या सर्व खर्चिक बाबींना दुजारा देऊन, कापरे आणि दोरगे पाटील या परिवाराने घेतलेल्या निर्णयाचे पंचक्रोशीत स्वागत केले जात आहे, पुणे जिल्ह्यात व महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या स्नेहवन सामाजिक संस्थेतील आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर, यांच्या मुलांच्या शिक्षण संगोपनासाठी, देणगी स्वरूपात दान देऊन पुण्यकर्माचे कार्य, या नववधू वरांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर,भांडगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच संतोष दोरगे, दौंड कृषी बाजार समिती मा सभापती रामचंद्र चौधरी, पंचायत समिती माजी सदस्य कुंडलीक खुटवड, डाळिंब ग्रामपंचायत सरपंच बजरंग मस्के,यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच नाथदेव दोरगे, यवत वि का सो, चेअरमन रमाकांत यादव, उद्योजक गुलाब आप्पा खुटवड, ग्रामपंचायत सरपंच शिवाजी चव्हाण, भांडगाव ग्रामपंचायत सदस्य रवींद्र दोरगे, संतोष दोरगे, विजय दोरगे, रामदास दोरगे, दौंड तालुका काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल दोरगे,यवत ग्रामपंचायत माजी सदस्य साजिद भाई सय्यद, यांच्या उपस्थितीत स्नेहल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष याना धनादेश देण्यात आला स्नेहवन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक देशमाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले, २०१५ साली हि स्नेहवन सामाजिक संस्था पुणे येथे सुरू केली. अनाथ मुलांच्या शिक्षण संगोपनाची जबाबदारी घेऊन १८० मुलांना आपल्या मायेच्या सावलीत वाढवत आहेत. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी ऊसतोड कामगार शेतमजूर यांच्या मुलांच्या शिक्षण संगोपन व आरोग्यदायी आणि ज्ञानलयाची संपूर्ण जबाबदारी स्नेहवन मध्ये घेतली जाते, अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन उज्वल भविष्यात एक आदर्श युवा तरुण बनवण्यासाठी स्नेहवन सामाजिक संस्था कार्यरत असल्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक देशमाने यांनी सांगितले. या वेळी दौंड तालुक्यातील भांडगाव पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते शाम कापरे आणि श्री सदाशिव पुंडलिक दोरगे, यांचे स्नेही मित्र परिवार सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष