यवत ग्रामसभेचा कोरम महिलांमुळे पूर्ण, शासकीय अधिकारी सह अनेक सदस्य गैरहजर, मुख्य चौकात वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

By : Polticalface Team ,27-01-2023

यवत ग्रामसभेचा कोरम महिलांमुळे पूर्ण, शासकीय अधिकारी सह अनेक सदस्य गैरहजर, मुख्य चौकात वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२६ जानेवारी,२०२३ यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत ग्रामसभेला पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक उपस्थिती दर्शवली होती. संत तुकाराम महाराज पालखी स्थळ येथे ग्रामसभेचे आयोजित करण्यात आली होते, या पूर्वी अधिक ग्रामसभा कोरम अभावी तहकूब झाल्या आहेत. यवत गावातील पुरुषांपेक्षा महिलांनीअधिक उपस्थिती ग्रामसभेला दर्शवली असल्याने ग्रामसभेचा कोरम पूर्ण झाला, यवत गावातील तलाठी मंडल अधिकारी सह अनेक सदस्य ग्रामसभेला गैरहजर दिसुन आले, सरपंच समीर दोरगे यांच्या आदेशानुसार ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी ग्रामसभेतील वृत्तांत वाचून दाखवले, त्यामध्ये प्रामुख्याने रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या लाभार्थीनी अद्याप घरकुल बांधकाम सुरू केले नाही, लाभार्थ्यांनी तत्काळ घरकुल बांधकाम सुरू करावे, तसेच काही लाभार्थी यांचे आर्थिक तजबीज नसल्याने व जागा उपलब्ध नसल्याने लाभार्थींनी जागा खरेदी केल्यास शासकीय मदतीचा हातभार होऊ शकतो, याची तत्काळ दखल घ्यावी, असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी यांनी दिले, ऐनवेळी विषयावर ग्रामस्थांनी व महिलांनी विविध सार्वजनिक प्रश्न उपस्थित केले, शासकीय योजनांची माहिती मिळावी त्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिक निराधार, व्यक्तींना मासिक अनुदान मिळण्या बाबत प्रस्ताविक अर्ज संदर्भात सहकार्य करावे, ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालयात चकरा मारायला लावू नये, तसेच दिव्यांग नागरिकांना ग्रामपंचायत पाच टक्के वार्षिक अनुदान वेळेत मिळत नाही, ते तत्काळ मिळावे, अशी प्रतिक्रिया दिव्यांग जेष्ठ नागरिक गोपाळराव माळवदकर यांनी व्यक्त केली, सरपंच समीर दोरगे यांनी सदर विषयाचे खंडन करुन, ग्रामपंचायत कर थकबाकीदार असताना देखील दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून मागील वर्षी अनुदान देण्यात आले, तसेच गावातील काही दिव्यांग व्यक्ती आर्थिक सबळ सक्षम असून देखील शासनाचे अनुदान घेत आहेत, परंतु कर थककरबाकी भरण्या बाबत सकारात्मक भुमिका घेतली जात नाही या संदर्भात सरपंच समीर दोरगे यांनी शोकांतिका व्यक्त करुन मार्च अखेर पर्यंत दिव्यांग जेष्ठ नागरिकांच्या परिस्थितीची दखल घेऊन अनुदान देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन सरपंच यांनी दिले, या वेळी नागरिक व महिलांनी यवत गावातील विविध मागण्यांचे अर्ज सरपंच व ग्रामविकास अधिकारी चखाले यांना देण्यात आले, या मध्ये मुख्य बाजारपेठेत श्री काळभैरवनाथ मंदिर समोर वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला आहे, या संदर्भात समस्त ग्रामस्थ नागरिकांनी अर्ज दिला आहे, मानकोबा वाडा येथील अधिक आकारलेली पाणीपट्टी कमी करण्या बाबत, मल्हारी नातू बिचकुले यांनी अर्ज दिला आहे, गाव कोंडवळा बाजुला वसुंधरा दुकानदार यांनी झाड तोडून अतिक्रमण केले बाबत, दत्तात्रय कुल यांनी अर्ज दिला आहे या संबंधित विषयाच्या अनुषंगाने तत्काळ पाहणी करून दखल घेतली जाईल असे आश्वासन सरपंच यांनी उपस्थित महिला व नागरिकांना दिली, अनेक महिन्यापासून ग्रामसभा कोरम अभावी तहकुब होत आहे, मात्र महिलांच्या उपस्थितीमुळे ही ग्रामसभा सुरुळीत पार पाडली, शासकीय नियमानुसार ग्रामसभेत स्थानिक शासकीय अधिकारी व सदस्य उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील काही ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक शासकीय अधिकारी जाणिवपूर्वक गैरहजर असल्याचे दिसून आले, शासकीय पदाधिकारीच ग्रामसभेत उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभा वेळोवेळी तहकूब झाल्या आहेत, सर्वसामान्य नागरिकांनी शासकीय कार्यालयात पायपीट करावी लागते. नागरिकांनी आपल्या समस्या कुणापुढे मांडाव्यात असा सवाल उपस्थित महिला व नागरिकांनी केला आहे, या संदर्भात वरिष्ठ अधिकारी दौंड तहसीलदार व गटविकास अधिकारी दखल घेतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष यादव, सदस्य नाथदेव दोरगे, इम्रान भाई तांबोळी, गौरव दोरगे, मंदाकिनी कुदळे, शितल दोरगे, जिजाऊ ब्रिगेड महिला अध्यक्षा सौ सारिका भुजबळ, बाईजाबाई पवार आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, विविध महिला बचत गट, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.