वैयक्तिक वादाला सामाजिक स्वरूप देत एकवटले राजकीय नेते..! श्रीगोंद्यात राजकीय शक्तींचा मागासवर्गीयांवर दबाव.. नमूद आंदोलनानंतर दलित समाज भीतीच्या सावटाखाली..

By : Polticalface Team ,27-01-2023

वैयक्तिक वादाला सामाजिक स्वरूप देत एकवटले राजकीय नेते..! श्रीगोंद्यात राजकीय शक्तींचा मागासवर्गीयांवर दबाव.. नमूद आंदोलनानंतर दलित समाज भीतीच्या सावटाखाली.. 
दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी श्रीगोंदा शहरात झालेल्या दोन गटातील हानमार प्रकरणानंतर श्रीगोंदा तालुक्यातील सर्व राजकीय संघटना एकवटून, घटनेचा निषेध करण्याऐवजी मागासवर्गीय समाजाच्या अस्मितेचा विषय असलेल्या ॲट्रॉसिटी बाबत गरळ ओकताना दिसले. दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी मागासवर्गीय समाजातील तरुणांची सवर्ण समाजातील तरुणांबरोबर गाडीचा कट लागला म्हणून वाद झाला होता. वाद मिटला तरी सवर्ण समाजाच्या मुलांनी मागासवर्गीयांच्या दोन मुलांना जबरी मारहाण केली होती. मारहान झाल्यानंतर नमूद पीडित मुलं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता, तेथे नगरसेवक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा शाब्दिक बाचाबाची होऊन, रागावलेल्या तरुणांमध्ये हाणामारी झाली. यात दोन सवर्ण समाजाचे युवक जखमी झाले.

वाद मिटलेला असताना दोन गटात हा वाद झाला. मात्र, काही राजकीय शक्ती या वादाला राजकीय ताकद करू पाहत आहेत. समन्वय साधत शांततेने गुन्हेगारी वृत्तीच्या एका कुटुंबाविषयी बोलण्याऐवजी संपूर्ण मागासवर्गीय समाजाला या आंदोलनात लक्ष करण्यात आले.

आंदोलनात सक्रिय असलेल्या आयोजकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाने दिलेल्या सीआरपीसी 149 च्या नोटीसला न जुमानता हे आंदोलन केले. नमूद आंदोलनात वक्त्यांनी प्रक्षोभक भाषणे केली. ज्यात त्यांनी जातीसाठी एकवटलोय.., ॲट्रॉसिटी बाबत चुकीचं आणि कटकारस्थान होईल असे वक्तव्य करण्यात आले.., कोपर्डीच्या घटनेचा उल्लेख करून जमाव भडकावण्याचा प्रयत्न..., मागासवर्गीय समाजाबाबत उल्लेख करताना विशिष्ट समाज असा उल्लेख.., आंम्हाला जातीवादाचे सर्टिफिकेट द्यायचे तर द्या.., तुमच्या बापाला भीत नाही.., बघून घेण्याची धमकी.., तसेच जुन्या घटनांचा व्हिडिओ व्हायरल करून श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न.., मागासवर्गीय समाजाला उद्देशून यांच्या रक्तातच गुन्हेगारी असलेला समाज असा उल्लेख.., मागासवर्गीय कार्यकर्त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे वक्तव्य..., तर, ज्येष्ठ आणि दिग्गज समजणाऱ्या नेत्यांनी तर उद्या प्रशासनाला विचारात न घेता या सर्वाचा उद्रेक होईल असे वक्तव्य केले... सन 2001 साली घडलेल्या घटनांचा उल्लेख नमूद केला.., त्या घटनांचा उल्लेख करत आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.. परंतु, तत्कालीन श्रीगोंदा पोलीस निरीक्षकाने ॲट्रॉसिटी दाखल न करता आम्हाला सहकार्य केले. असे सर्व भडकावू वक्तव्य नमूद आंदोलनात व्यक्त करण्यात आले.. श्रीगोंदा तालुक्यात चालू असलेल्या विविध अवैध धंद्यांवर पोलीस यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे कारण दाखवत.. पोलीस प्रशासनासह मागासवर्गीय समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आले.

आता काय झालं तर..? आम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाहीत..! एकेकांचा बंदोबस्त करू, अशा वक्तव्याने तालुक्यातील मागासवर्गीय समाज भीतीच्या सावटाखाली आला असल्याचे या आंदोलनानंतर दलित कार्यकर्ते सांगत आहेत. नमूद आंदोलनामध्ये स्वतः श्रीगोंदा/नगर मतदार संघाचे आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब नाहटा, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, बाळासो बळे सर, बापू गोरे, संतोष इथापे, सुनिल वाळके, मनोहर पोटे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी काही नगरसेवक, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सह समविचारी कार्यकर्ते, पदाधिकारी व शहरातील नमूद गटाचे समर्थक उपस्थित होते.
आंदोलनानंतर मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांची भेट घेतली व नमूद आंदोलनात दलित व मागासवर्गीय समाजाबाबत झालेला विरोधाभास नमूद केला. सदर आंदोलन हे गुन्हा करणाऱ्या लोकां विरोधात नसून, संबंध मागासवर्गीय समाजाबाबत चालवलेले आंदोलन आहे, असे सांगितले. अनेकदा श्रीगोंदा शहरात दोन गटांमध्ये वाद झालेला आहे. मात्र, तो वाद मागासवर्गीयांचा विरोधात असल्यास असंविधानिक रित्या शहर बंद करणे, असंवेदनशील वक्तव्य करत आंदोलन करने.. असे प्रकार श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील दलित आदिवासी मागासवर्गीय समाजावर दहशत निर्माण करणारे असल्याचे यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाला सांगण्यात आले.


स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.