माध्यमिक शिक्षक सोसायटी मातृसंस्था समजून निवृत्तीनंतरही सभासदांनी सकारात्मक दृष्ट्या पहावे प्रा भाऊसाहेब कचरे

By : Polticalface Team ,27-01-2023

माध्यमिक शिक्षक सोसायटी मातृसंस्था समजून निवृत्तीनंतरही सभासदांनी सकारात्मक दृष्ट्या पहावे प्रा भाऊसाहेब कचरे लिंपणगाव (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटी ही सभासदांनी मातृसंस्था समजून भविष्यातही सेवानिवृत्तीनंतर सभासदांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा ,असे आवाहन माध्यमिक शिक्षक सोसायटीचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक प्रा भाऊसाहेब कचरे यांनी केले आहे. श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक व सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता समारंभ तालुक्यातील पत्रकारांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब काकडे हे होते.

यावेळी मार्गदर्शन करताना कचरे पुढे म्हणाले की, आपण माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सूत्रे हातात घेतल्यानंतर सभासद हित व गुणवंतांचे कौतुक या बाबींकडे अधिक लक्ष दिले. माध्यमिक शिक्षक सोसायटीने आतापर्यंत 935 कोटीचे कर्ज वाटप केले असून, डिसेंबर 22 अखेर 35 कोटी संस्थेला नफा झाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे जिल्ह्यातील संस्थेचे जवळपास 89 सभासद मयत झाले. त्यांना जवळपास संस्थेेने कोट्यवधी रुपयाची आर्थिक मदत करून संपूर्ण कर्ज माफ केले असे सांगून प्रा कचरे पुढे म्हणाले की संस्थेचा कारभार पाहताना संस्थेचे हित व सभासदांना अल्प व्याज दरात कर्ज देणारी एकमेव संस्था म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीकडे पाहिले जाते. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सभासद मयत झाला तर त्याचे संपूर्ण कर्ज माफ करणारी राज्यात एकमेव संस्था म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीकडे पाहिले जाते. त्यामुळे ही संस्था नेहमीच ऑडिट "अ "वर्गामध्ये कायम आहे. या संस्थेचे ज्या मयत कर्जदाराला जामीनदार आहेत, त्यांच्यावर देखील कुठल्याही प्रकारचा कर्जाचा आधीभार टाकला जात नाही. या संस्थेमध्ये जवळपास 825 कोटीच्या ठेवी आहेत. त्यामुळे ठेवीवर व्याज जरी कमी असले तरी मात्र कर्जदाराला व्याज देखील सात टक्क्याने अल्प दरात आकारले जाते. यापुढे संस्थेच्या सभासदांनी निवृत्तीनंतरही या मातृसंस्थेकडे प्रेमाने पाहून वेळोवेळी लक्ष द्यावे. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, संस्थेच्या शाखेमध्ये काही गैरबाबी निदर्शनास आल्या तर आम्हाला त्या तात्काळ कळवाव्यात असे आव्हान देखील प्रा भाऊसाहेब कचरे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मुख्याध्यापक विलास शितोळे यावेळी म्हणाले की प्रा भाऊसाहेब कचरे यांनी माध्यमिक शिक्षक सोसायटी सक्षमरीत्या चालवून सभासद हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेचा उत्तम प्रकारे कारभार कारभार पाहताना खर्चात काटकसर व गुणवंतांना नेहमीच सन्मानित केल्याचे सांगून जिल्ह्यात माध्यमिक सोसायटीचा आदर्श असा कारभार केल्याचे सांगितले.

याप्रसंगी दक्ष फाउंडेशन चे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार दत्ताजी जगताप यावेळी म्हणाले की, जिल्ह्यातील पत्रकार नेहमीच संस्थेचा कारभार उत्तम असला तर त्याचे कौतुक करतात. जिल्ह्यातील पत्रकारांचे देखील जीवन धावपळीचे व दगदगीचे आहे त्यातून एखाद्या पत्रकाराचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला तर या संस्थेने देखील त्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी तरतूद करावी असे सांगितले.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष धोंडीबा राक्षे, संचालक धनंजय म्हस्के, नागवडे कारखान्याचे संचालक डीआर आबा काकडे ,श्रीराम पतसंस्था संचालक श्री विलास शितोळे ,क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र जामदार, पंढरीनाथ सुपेकर, मधुकर नागवडे, मुख्याध्यापक मधुकर गिरमकर, शिवाजी क्षीरसागर, चंद्रकांत वागस्कर, सुरेश सरोदे , चंद्रकांत पवार, दिलीप काटे, पत्रकार सर्वश्री बाळासाहेब काकडे, आकाश नडे, योगेश चंदन, समीरण नागवडे, नंदकुमार कुरुमकर, गणेश कविटकर, दादा सोनवणे, काका कुलकर्णी, दत्ताजी जगताप, प्रमोद आहेर ,जयराम धांडे आदीं पत्रकारांसह माध्यमिक शिक्षक सोसायटीचे आजी-माजी सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादाजी घोंडगे, बाळासाहेब भोर, रामदास फटाकडे, राम जंजिरे, पत्रकार बाळासाहेब काकडे, दत्ताजी जगताप आदींची गौरदगारपर भाषणे झाली प्रास्ताविक संस्थेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव आळेकर यांनी केले सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक हनुमंतराव रायकर यांनी केले तर आभार संस्थेचे जेष्ठ संचालक दिलीप काटे यांनी मानले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष