Honour Killing: प्रेमसंबंधातून आई-वडिल, भावांनी मिळून मुलीला संपविले

By : Polticalface Team ,28-01-2023

Honour Killing: प्रेमसंबंधातून आई-वडिल, भावांनी मिळून मुलीला संपविले नांदेडः गावातील तरुणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या आई-वडिल, दोन भाऊ आणि मामाने मिळवून तरुणीची हत्या केली. मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राखही ओढ्यात टाकून पुरावा नष्ट केला. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल गावात घडली आहे. या ऑनर किलिंगने ( Honour Killing) महाराष्ट्रात खळबळ उडाली. गेल्या महिन्यात औरंगबाद जिल्ह्यामध्येही अशीच घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.

शुंभागी जोगदंड ( Shubhangi Jogdand) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. ती बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. या प्रकरणी मुलीचे आई-वडिल, दोन भाऊ आणि मामा अशा पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती लिंबगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. शुंभागी हिचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्याला तिच्या घरच्यांचा विरोध होता. मुलीच्या इच्छेविरुध्द पालकांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे लग्न जुळवले होते. परंतु प्रेमसंबंधामुळे ठरविलेले लग्नही मोडण्यात आले होते.

मुलीने लग्न मोडल्याने तिच्या घरचे संतापले होते. तसेच गावात बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता. त्यातून पाचही जणांनी मिळवून रविवारी शुभांगीची हत्या केली. त्यानंतर घराजवळच मृतदेह जाळून टाकला. पुरावा राहू नये म्हणून मृतदेहाची राखही गावातीलच ओढ्यात नेऊन टाकली होती.

शुभांगी ही गेल्या तीन दिवसांपासून गावातून गायब होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. मुलीच्या आई-वडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी आई-वडिल, दोन भाऊ आणि मामाने मिळवून मुलीचे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी