By : Polticalface Team ,28-01-2023
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान यातील मयत विजयप्रफुल्ल काळोखे हा घरातुन बाहेर जाताना सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम घेवुन गेला होता अशी माहिती मयताचे नातेवाईकाकडून मिळाली होती त्यामुळे वेल्हे पोलीसांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची शहानिशा घेण्याकरीता नितीन निवंगुणे यास तपासकामी बोलावून घेऊन त्याचेकडे तपास केला असता त्याने सांगीतले की, मयत विजय प्रफुल्ल काळोखे हा घरी सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम घेवुन आला होता ही माहिती त्यांना समजली ते सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम पाहून आरोपी यांने लोभ व हव्यासापोटी त्याने संतोषनगर कात्रज येथे स्टिलच्या चिमटयाने मयत विजय प्रफुल्ल काळोखे याचे डोक्यात, तोंडावर मारून त्यास जबर जखमी करून त्याचा खुन केला व पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने त्याचे प्रेत प्लास्टीकचे बॅरलमध्ये टाकले. सदरचे प्रेत असलेला प्लास्टीकचा बॅरल उचलुन इनोव्हा कारमध्ये टाकून मौजे रानवडी ता.वेल्हे, जि. पुणे येथे आरोपी नितीन निवंगुणे याचे शेतजमीन गट नं. ४० मध्ये आरोपी विजय दत्तात्रय निवंगुणे याचे सहायाने खड्ड्यात पुरलेआहे अशी माहिती समोर आली त्यानुसार आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला.
गुन्हयाचे पुढील तपासात मा. तालुका कार्यकारी दंडाधिकारी सो, वेल्हे यांनी सी.आर.पी.सी. | १७६ प्रमाणे कार्यवाही केली असता मयत बॉडी मिळून आलेली आहे सदर प्रेताची पाहणी करुन सदर प्रेताचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले आहे. यातील आरोपी नितीन निवंगुणे याला विश्वासात घेवुन मयताचे सोन्याचांदीचे दागीन्यांबाबत विचारणा केली असता सदरचे दागीने व रोख रक्कम त्याचा मुलगा ओंकार नितीन निवंगुणे याचेकडे ठेवण्यासाठी दिले असल्याचे सांगीतले. त्याअनुषंगाने आम्ही आरोपी ओंकार नितीन निवंगुणे याचेकडे तपास करता त्याचेकडून (१) रु. १,५६,००,०००/- किमतीचे एकुण २७४३ ग्राम १२० मि.ली. वजनाचे सोन्याचे विटा व दागीने तसेच २९ ग्रॅम ६८० मिली वजनाचे चांदीचे दागीने, (२) रू.१४,२९,७५०/- किंमतीचे एकुण वजन २८ किलो ५९५ ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व विटा व आठ लाख रूपये (३) ९,११,४१५ /- रोख रक्कम, गुन्हा करण्याकरीता वापरलेले वाहन (४) रू. ४,००,०००/- एक इनोव्हा कार, (५) रु. ३५,०००/- एकटीव्हा गाडी असा एकूण रू. १,८३,७६, १६५/- (एक कोटी त्र्याऐंशी लाख सहयात्तर हजार एकशे पासष्ट ) रूपयाचे चे सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज पवार हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. श्री अंकित गोयल, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण मा. श्री. मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पुणे विभाग, मा. भाउसाहेब ढोले पाटील, उप. | विभाग पोलीस अधिक्षक, हवेली विभाग हवेली यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण सहा. पोलीस निरीक्षक श्री मनोज पवार व पोलीस उप निरीक्षक श्री. महेश कदम व पथकातील अंमलदार सहा फौज / सुदाम बांदल, योगेश जाधव ब.नं.१५४५, पो. हवा रविंद्र नागटीळक, पो. हवा. पंकज मोघे, पो. हवा ज्ञानदिप धिवार, पो.ना. अजयकुमार शिंदे, पो.कॉ. कांतीलाल कोळपे, आकाश पाटील यांनी केली आहे. वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष