वढू खुर्द ग्रामपंचायत प्रजासत्ताक दिनी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नोंद रजिस्टर मध्ये ११० सह्या तर कोरम अभावी ग्रामसभा तहकूब

By : Polticalface Team ,28-01-2023

वढू खुर्द ग्रामपंचायत प्रजासत्ताक दिनी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नोंद रजिस्टर मध्ये ११० सह्या तर कोरम अभावी ग्रामसभा तहकूब दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता २८ जानेवारी २०२३ रोजी वढू खुर्द ग्रामपंचायत ता, हवेली जिल्हा पुणे येथील २६ जानेवारी २०२३, ग्रामसभेची माहिती मिळण्या बाबत अर्जाद्वारे प्रकाश दीपक चव्हाण यांनी मागणी केली आहे.

वढू खुर्द ग्रामपंचायत ता हवेली जिल्हा पुणे येथिल ग्रामपंचायत ग्रामसभा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधिल कलम ३६ तरतुदी नुसार ग्रामसभा संदर्भात काही माहिती घेत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शासकीय ग्रामसभा करणे बंधनकारक असल्याने वढू खुर्द ग्रामपंचायतीचा प्रकार समोर आला आहे, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात ११० नागरिकांच्या नोंद रजिस्टर मध्ये सह्या घेऊन,नंतर ग्रामसभा पूर्ण झाल्याचा दावा फसला असल्याचे प्रकाश दीपक चव्हाण यांनी सांगितले.

वढू खुर्द गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर समोर हॉलमध्ये २६ जानेवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली मात्र उपस्थित नागरिकांची संख्या ३०ते ३५ एवढीच होती त्यामध्ये नोंद रजिस्टर नागरिकांचे नाव व सही घेण्याचे काम कर्मचारी करत होते, नोंद रजिस्टर प्रकाश चव्हाण यांच्या पर्यंत पोहोचले, त्यावेळी ११० नागरिकांचे नाव व सह्या झालेले त्यांच्या निदर्शनास आले, तोपर्यंत ग्रामसभा चालू करण्यात आली होती, प्रकाश चव्हाण यांनी सदर प्रकार बाबत कोरम पूर्ण दिसत नसल्याची खंत व्यक्त करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधिल ३६ नुसार अधिक माहिती सांगत ग्रामसभेचा कोरम पूर्ण नाही असे सागताच उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी चालु ग्रामसभा कोरम अभावी तहकूब करण्याची घोषणा केली.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना नागरिकांच्या नोंद रजिस्टर मध्ये नाव व सह्या घेण्यात आल्या होत्या मात्र ग्रामसभेला नागरिक उपस्थित नव्हते, कदाचित प्रकाश चव्हाण यांनी सर्व प्रकार उघडकीस आणला, असल्याने सदर ग्रामसभा तहकूब करण्यात आली, अन्यथा ग्रामसभा कोरम पूर्ण करून पार पडली असती, असा बिनतोड युक्तिवाद प्रकाश चव्हाण यांनी उपस्थित करून, लोकशाहीला कालिमा फासणारी घटना समोर आणली आहे, वढू खुर्द ग्रामपंचायत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना ११० नागरिकांच्या नोंद रजिस्टर वरती सह्या घेण्यात आल्या होत्या, सदर प्रकार उघडकीस आल्याने वढू खुर्द ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक गडबडून गेले आणि तत्काळ २६ जानेवारी शासकीय नियोजित चालु ग्रामसभा तहकूब घोषित करण्यात आली सदर प्रकार निंदनीय असून लोकशाही हतबल करणारा ठरतो असे स्पष्ट मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे, दि.२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी घडलेल्या प्रकाराबाबत प्रकाश दीपक चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामसभेची सर्व माहिती मागितली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बातमी स्रोत : निवेदन

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.