आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने जावजीबुवाची वाडी जिल्हा परिषद गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

By : Polticalface Team ,28-01-2023

आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने जावजीबुवाची वाडी जिल्हा परिषद गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौड २८ जानेवारी २०२३, दौंड तालुका पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी ता दौंड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील २१ गुणवंत विद्यार्थी यांना आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इतर विध्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने इयत्ता १ ली ते ७ वी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

या प्रसंगी आनंदी जीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहसीन पठाण यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून आनंद व्यक्त करत आपला जीवन प्रवास सांगत ते म्हणाले मी स्वतः एक डॉक्टर आहे, विदयार्थी ते डॉक्टर हा माझा प्रवास खूप कठिण परिस्थितीतून झाला अनेक संकटांचा संघर्ष करुन इथपर्यंत पोहचलो आहे. मला माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप लोकांचे सहकार्य लाभले आहे. याची मला जानिव आहे,परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण अर्धवट राहू नये, सर्वांना उच्चशिक्षण मिळावे, समाजात समतोल निर्माण व्हायला हवा, समाजातील होतकरू व हुशार विद्यार्थी निर्माण व्हावेत, समाजातील सामाजिक बांधिलकी टिकून राहावी हि संकल्पना बाळगून आम्ही सर्व मित्र एकत्रित आलो, आणि आनंदी जीवन फाउंडेशन या नावाने सामाजिक संस्था सुरू केली.

फाउंडेशनच्या माध्यमातून लवकरच ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच ग्रामीण भागातील निराधार जेष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम चालू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले, या वेळी जावजीबुवाची वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका, शाळेतील गुणवंत विद्यार्थी तसेच पालक व उपस्थित आनंदी जीवन फाउंडेशनचे मान्यवर यांनी विद्यार्थ्यांची स्फूर्ती वाढवण्याचे प्रयत्न केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी