९ वर्षीय अपहरीत अल्पवयीन मुलीचा बेलवंडी पोलीसांकडुन १२ तासाचे आंत शोध

By : Polticalface Team ,30-01-2023

९ वर्षीय अपहरीत अल्पवयीन मुलीचा बेलवंडी पोलीसांकडुन १२ तासाचे आंत शोध बेलवंडी ता . श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्यीतील साजन शुगर सकारी साखर कारखाना ढवळगांव येथे उसतोडीसाठी आलेले कामगार नामे सुनील दशरथ पावरा हे आपली पत्नी व पाच मुलांसह कारखान्यासमोरील मोकळया जागेत पाल टाकुन वास्तव्यास असतांना दिनांक २७.०१.२०२३ रोजी कुटूंबीयासह झोपले असता सकाळी सहा वाजता उठल्यानंतर त्यांना त्यांची मोठी मुलगी रवीता वय वर्ष ९ ही झोपलेली आढळुन आली नाही . त्यामुळे त्यांनी दिवसभर आपले सोबतच्या कामगारा सोबत परीसरांत शोध घेतला व मुलगी मिळुन न आलेने रात्री ९ वाजता पोलीस स्टेशनला माहीती देण्यासाठी आले तक्रारदारांना विचारपुस करुन व मुलीचे वय पाहता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर , पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे व स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी शहानिशा केल्यानंतर रविता हीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता पळवुन नेलेबाबत खात्री झालेने पीडीतेचे वडील सुनील दशरथ पावरा वय ३८ वर्ष रा.देवळी आडगांव ता.चाळीसगांव जी.जळगांव याचे फिर्यादवरुन गु.र.नं .२८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्वतःकडे तपास घेतला . अपहरीत मुलीबाबत परीसरांतील नागरीकांशी तसेच पोलीस पाटील यांचेशी संपर्क करुन माहीती घेत असतांनाच स्थानीक नागरीकांचे विवीध व्हॉटसअप ग्रुपवर मुलीचे फोटो व वर्णनासह माहीती प्रसारीत करण्यात आली . त्यावेळी माठ येथील उमेश घेगडे व महेश महाडीक रा. उकडगांव यांनी सदर मिळतेजुळते वर्णनाची मुलगी ही उकडगांव बसस्टॅन्डवर लहान बाळासह असल्याचे पोलीसांनी सांगीतले . त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे सोबतचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन अपहरीत मुलगी तीच असल्याची खात्री झाल्याने तीचेकडे अधिक विचारपुस केली असता तीस एक पारधी समाजाचे महीलेने ती पालाचे बाहेर लघवीस गेलेली असतांना पहाटेचे वेळी बळजबरीने घेवुन आले बाबत सांगीतले . त्यावरुन सदर पारधी महीला सुप्रिया सचीन काळे वय २२ वर्ष रा . सातव अरणगांव दुमाला ता.श्रीगोंदा हीस ताब्यात घेण्यात आलेले असुन पुढील रितसर कारवाई करण्यात येत आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब , अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर , पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे , पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांचेसह स . फौजदार मारुती कोळपे , सहाय्यक फौजदार रावसाहेब शिंदे , पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे , पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंपणकर , संदीप दिवटे , सतीष शिंदे , चालक विकास सोनवणे , भाऊसाहेब शिंदे , विनोद पवार यांनी केलेली आहे .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष