श्रीगोंदा पोलीसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई

By : Polticalface Team ,30-01-2023

श्रीगोंदा पोलीसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई श्रीगोंदा : पोलीस अधीक्षक मा. राकेश ओला सो, अहमदनगर यांनी गावठी हातभट्टी व अवैध दारु, जुगार यावर कारवाई करणेबाबत आदेशीत केलेले आहे. त्याअनुशंगाने श्रीगोंदा तालुक्याचे हद्दीमध्ये कारवाई करणेकरिता तीन पथके तयार करण्यात आली आहेत. दि. 01 जानेवारी पासुन 29/01/2023 पर्यंत श्रीगोंदा शहर, काष्टी, श्रीगोंदा कारखाना, जामदार मळा, शंकरनगर पेडगाव, हिरडगाव फाटा, आनंदवाडी येथे गावठी हातभट्टी व अवैध दारु याबाबत माहीती काढुन विशेष मोहीम राबविली व विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. गावठी हातभट्टी व अवैध दारुवर रेड करुन 38 आरोपीविरुध्द मुंबई दारुबंदी कायद्यान्वये 35 गुन्हे दाखल करुन 219510/-रु.मुद्देमाल नाश/जप्त करण्यात आलेला आहे. जुगार संदर्भात 13 आरोपींविरुध्द 02 गुन्हे दाखल करुन 4200/-रु. मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माहीती काढुन सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर छापे टाकुन समुळउच्चाटन करण्याची धडक कारवाई चालु आहे. सन-2022 मध्ये पोलीस हद्दीमध्ये श्रीगोंदा शहर,काष्टी व इतर गावामध्ये वेळोवेळी गावठी दारु हातभट्टी विक्री, देशी दारुवर रेड करुन 262 आरोपींवर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये 259 गुन्हे दाखल करुन 12,71,859/-रु. चा मुद्देमाल नाश/जप्त केला आहे. जुगार संदर्भात रेड करुन 136 आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये 50 गुन्हे दाखल करुन 5,14,603/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई मा.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रामराव ढिकले, पोलीस निरीक्षक, महेश जानकर, सहा.पोलीस निरीक्षक, समीर अभंग, अमित माळी, सुनिल सुर्यवंशी पो.उप.निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी