छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकात थांबा दयावा - आमदार राहुल कुल यांची मागणी
By : Polticalface Team ,31-01-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,३० जानेवारी २०२३
लवकरच महाराष्ट्राला दोन राज्यांतर्गत वंदे भारत गाड्या मिळणार आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते शिर्डी रेल्वे मार्गावर धावतील देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण होणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनची नियमित सेवा सुरू झाल्या नंतर या ट्रेनला दौंड स्थानकात थांबा दयावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.मा रावसाहेबजी दानवे पाटील यांचेकडे पत्राद्वारे आमदार राहुल कुल यांनी केली आहे
दौंड जंक्शन हे मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. पुण्याहून अहमदनगर, शिर्डी, मनमाड, भोपाळ आणि नवी दिल्लीकडे उत्तरेकडे जाणार्या सर्व गाड्या या स्थानकावरून जातात, अनेक प्रवासी गाड्यांसाठी हा एक प्रमुख थांबा आहे आणि एक प्रमुख मालवाहतूक केंद्र आहे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेन दौंड तसेच आजुबाजूच्या बारामती, इंदापूर, श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यांना देखील सोयीची ठरेल विशेषत: व्यापारी, सरकारी अधिकारी, कामगार व विद्यार्थ्यांना या ट्रेनचा मोठा फ़ायदा होईल याबाबत माननीय रेल्वे राज्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी