व्यंकनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून दातृत्व भावनेतून भरीव मदत ही कौतुकास्पद बाब --प्राचार्य दत्तात्रय सस्ते
By : Polticalface Team ,01-02-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) -श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून दातृत्व भावनेतून या विद्यालयाला दहावीपर्यंत शिक्षण घेऊन संस्कार व शिक्षकांकडून उत्कृष्ट ज्ञानाचे धडे मिळाले त्या विद्यालयाला कृतज्ञता म्हणून भरीव मदत ही कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोदगार विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी काढले
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी वसुंधरा बचाव अभियान व १९९७ SSC बॅच अंतर्गत तालुका, व जिल्हास्तरावर खेळाडू तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा विद्यालयात पार पडला.
या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी खेळामध्ये प्रावीण्य मिळविले होते. अशा सर्व विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व मिडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे गोड तोंड करण्यासाठी चॉकलेट, बिस्कीट, खाऊ यावेळी वाटप करण्यात आले. खरोखर *वसुंधरा बचाव अभियाना अंतर्गत लोणी व्यंकनाथ गावामध्ये सामाजािक कार्य केले आहे. त्यामध्ये झाडे लावणे, त्यांची निगा राखणे, तारेचे कंपाऊंड, बेटी बचाव अभियान, लोणी गावामधील साफ सफाई, जेसीबी मशीनने सपाटीकरण करणे, काट्या काढणे, त्यामध्ये शाळेला लाईट, फॅन, तारेचे कुंपण असे अनेक उपक्रम गावामध्ये राबवले आहेत.* तसेच विद्यालयासाठी देखील या टीमने आर्थिक मदत देखील केली आहे. हा एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. *
माजी विद्यार्थी गणेश खंडागळे यावेळी म्हणाले की, भविष्यात पुढे अनेक सामाजिक कार्य करायचे आहे. गावच्या विकासात भर टाकत असताना जेथे आपल्याला ज्ञानाचे व संस्काराचे धडे मिळाले त्या मातृसंस्थेसाठी देखील आम्ही सढळ हाताने देणगी स्वरूपात मदत करणार आहोत, असे श्री खंडागळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.*
विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी आपल्या भाषणात वसुंधरा बचाव अभियान व 1997 च्या एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाविषयी भरभरून मदत देत असतानाच गुणवंत विद्यार्थ्यांना देखील ट्रॉफी व मिडल देऊन प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगली नवी दिशा मिळणार आहे विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना सन्मानित केल्याबद्दल प्राचार्य श्री सस्ते यांनी संयोजकांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याना ट्रॉफी आणि मिडल खेळाडूंना वाटप करण्यात आले.
.
याप्रसंगी या सोहळ्यास श्री.गणेश खंडागळे, .श्री.फारुक इनामदार, .श्री.प्रकाश काकडे, .श्री.महेंद्र साळवे, .श्री.जावेद सय्यद, मा.श्री.अविनाश पवार, .श्री.संजय शिंदे, .श्री.अप्पासाहेब खराडे, .श्री.गोरख शिंदे, श्री.आकाश काकडे, .श्री.लक्ष्मण नलगे, .शांतीलाल मदने यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले,
उपस्थितांचे प्रकाश काकडे यांनी आभार मानले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी