पुणे सोलापूर हायवे दौंड तालुका वाखारी हद्दीत लक्झरी बस अपघात ४ प्रवाशांचा मृत्यू तर १५ जखमी

By : Polticalface Team ,01-02-2023

पुणे सोलापूर हायवे दौंड तालुका
वाखारी हद्दीत लक्झरी बस अपघात ४ प्रवाशांचा मृत्यू  तर १५ जखमी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे वाखारी ता दौंड जिल्हा पुणे येथील एच पी पेट्रोल पंपाच्या जवळ पाहाटे लक्झरी बसचा भिषण अपघात झाला असुन, त्यामध्ये मयत व्यक्तीची नावे १) नितीन दिलीप शिंदे, वय ३६ वर्ष रा,ढमाळवाडी भेकराईनगर हडपसर, २)अमर मानतेश कलशेट्टी वय २० वर्ष रा गोगाव सोलापूर, ३)गणपत मलप्पा पाटिल, वय ५५ वर्ष रा कात्रज पुणे, ४) आरती अंबाना बिराजदार वय ३० वर्ष रा घुलेवस्ती हडपसर पुणे, असे असुन या अपघातामध्ये १६ प्रवासी नागरिक जखमी झाले आहेत, या संदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे अपघात रजि.नं. 03/2023 खबर देणार आकाश शिवाजी चव्हाण वय -२७ वर्षे, व्यवसाय मजुरी,रा. काळेपडळ पापडेवस्ती हडपसर, लक्झरी बस चालकाचे नाव -शुभम संजय सुरवसे वय २५ वर्षे रा.हडपसर ता.हवेली जि.पुणे लक्झरी बस नं.एम.एच.१२/के.क्यु/६६९६ दि.०१/०२/२०२३ रोजी पहाटे ०४:४० वा.च्या.सु मौजे वाखारी ता.दौंड जि.पुणे गावचे हदिदत एच.पी.पेट्रोल पंपाचे जवळ अपघात झाला आहे.

जखमींची नावे 1) शंकर दिगंबर सरडकर वय 35 वर्षे, रा.आंबेगाव, कात्रज, पुणे 2) रेणुका शंकर सरडकर वय 30 वर्षे, रा.आंबेगाव, कात्रज, पुणे 3) श्रेयस शंकर सरडकर वय 11 वर्षे, रा.आंबेगाव, कात्रज, पुणे 4) जान्हावी शंकर सरडकर वय 06 वर्षे, रा.आंबेगाव, कात्रज, पुणे 5) नागेश शंकर बिरनोर वय वर्ष 25 वर्षे रा.सोलापूर.6) राजू शंकर अंजनगावकर वय वर्ष 23 वर्षे रा. सोलापूर. 7) आकाश शिवाजी चव्हाण 25 वर्षे रा. हडपसर. 8) जयश्री श्रीसेन सवळे वय 47 वर्षे, रा. टिळेकरनगर, कात्रज. 9) बसवन्ना गजप्पा गजा वय 43 वर्षे, रा. पुणे.10) अभिषेक बिराजदार वय 21 वर्षे, पुणे. 11) तुषार रणजित वाघमैतर वय 16 वर्षे, रा.तळेगाव ढमढेरे, पुणे, 12) श्रीदेवी रणजित वाघमैतर वय 32 वर्षे, रा.तळेगाव ढमढेरे, पुणे,13) सोनाली बसवान्नाज गजा वय 19 वर्षे, रा. टिळेकरनगर, कात्रज, 14) सायवन्ना गुंडप्पा जमादार वय 25 वर्षे, रा. टिळेकर नगर कात्रज.15) शुभम संजय सुरवसे वय 25 वर्षे, रा.हडपसर, पुणे, १०.जखमींच्याु उपचाराचे ठिकाण वरील जखमींपैकी अ.क्र. १ ते ७ यांच्याेवर निरामय रुग्णालय केडगाव येथे अ.क्र. ८ ते १४ यांच्यावर हर्ष मल्टी 5 स्पेजशालिटी रुग्णालय केडगाव येथे व अ.क्र.१५ यांच्यागवर यवत ग्रामीण रूग्णाचलय येथे उपचार सुरू आहेत.सदर घटनेची दखल घेतली उपविभागीय अधिकारी दौंड मा राहुल धस यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी भेट दिली

हकीगत दि.०१/०२/२०२३ रोजी पहाटे ०१:०० वाचे सुमा.मी तसेच माझा मित्र नितीन दिलीप शिंदे असे आम्ही सोलापुर एस.टी स्टॅड येथुन पुणे येथे घरी जाणेसाठी लक्झरी बस नं.एम.एच.१२/के.क्यु/ ६६९६ मधुन सोलापुर येथुन पुणे साठी निघालो. आमचे बरोबर ३५ ते ४० प्रवासी बसमध्ये बसलेले होते. त्यानंतर थोडया वेळाने सदर बसचा ड्रायव्हरला तुम्ही गाडी खुप रॅश पणे चालवित आहेत, तुम्ही गाडी हाळु चालवा असे आम्ही सांगितले नंतर तो आम्हाला म्हणाला की,तुम्ही माझ्या बॉडी व वया वर जावु नका, मी गाडी खुप वर्षापासून चालवत आहे. असे चालकाने सांगितले, तरी देखील त्याला आम्ही वेळोवेळी गाडी ही हाळु व व्यवस्थीत चालवा असे सांगत होतो. त्या नंतर आम्ही पहाटे ०४:३० वाचे सुमा.पाटस ता.दौंड जि.पुणे येथे टोल नाक्या जवळ चहा पिण्यासाठी थांबलो.मी व गाडीतील प्रवासी असे आम्ही चहा पिवुन पहाटे ०४:४० वाचे सुमा आम्ही सोलापुर पुणे रोडने पुणे बाजुकडे बसमधून जात असताना आम्ही लक्झरी बस वरील चालकास पुन्हा एकदा लक्झरी बस गाडी हाळु व व्यवस्थित चालवा असे सांगितले होते. त्या नंतर पहाटे ०५:०० वाचे सुमा. मौजे वाखारी ता.दौंड जि.पुणे गावचे हदिदत एच.पी.पेट्रोल पंपाचे जवळ लक्झरी बस वरील चालकाने लक्झरी बस ही भरधाव वेगात चालवित घेवुन जात असताना बसची सोलापुर पुणे हायवे रोडचे कडेला उभा असलेला ट्रक नंबर एम.एच.१२/के.पी/६६५० हीला पाठीमागुन जोरात ठोस बसुन अपघात झाला. अपघातात मला डोक्याला मार लागला. तसेच माझे सोबत बसमध्ये असलेले प्रवाशी यांना देखील दुखापत मार लागुन किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. त्यावेळी मला तेथील जमलेल्या लोकांनी बसमधुन बाहेर काढुन उपचारकामी अॅम्ब्युलन्समधुन निरामय हॉस्पीटल केडगाव ता.दौंड जि.पुणे येथे अॅडमिट केले आहे. सध्या माझेवर औषधोपचार चालु असताना माझे सोबत असलेल्या प्रवाशी यांचे पैकी माझा मित्र १) नितीन दिलीप शिंदे वय ३६ वर्ष रा.ढमाळवाडी भेकराईनगर हडपसर तसेच २) अमर मानतेष कलषेटटी वय २० वर्ष रा.गोगाव,सोलापुर ३) गणपत मलप्पा पाटील वय ५५ वर्ष रा.कात्रज पुणे ४) आरती अंबाना बिराजदार वय ३० वर्ष रा.घुलेवस्ती हडपसर पुणे यांना अपघातात किरकोळ व गंभीर दुखापत होवुन ते मयत झाल्याचे मला समजले आहे. सदर लक्झरी बसवरील चालकाचे नाव शुभम संजय सुरवसे वय २५ वर्ष रा.हडपसर ता.हवेली जि.पुणे असे असल्याचे मला समजले आहे. तपासी अधिकारी सपोनि लोखंडे, यवत पोलीस स्टे.शन, पुणे ग्रामीण मो. नं.७४९८८८८०१६ प्रभारी अधिकारी पो नि शेडगे,यवत पोलीस स्टेसशन, पुणे ग्रामीण मो.नं.९९२३६०००१७,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष