सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये पर्यावरण रक्षणाची शपथ घेवून विशेष संक्रांती
By : Polticalface Team ,01-02-2023
कुसगाव (बु)लोणावळा१ फेब्रु.,२०२३,
मकरसंक्रांति विशेष हळदी कुंकु समारंभ सिंहगड पब्लिक स्कूल च्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब चे अध्यक्ष आशिष मेहता यांची विशेष उपस्थिति होती.त्यांनी पर्यावरण रक्षणाची माहिती दिली. समारंभाची विशेष बाब म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवी वापरण्यासाठी जनजागृति करणे. रोटरी क्लबने कापडी पिशव्या देऊन सर्वांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी शिक्षकांमध्ये खूप उत्साह दिसून आला. सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ देखील घेतली. या विशेष कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लब तसेच राष्ट्रीय हरित सेना(ईको क्लब) व सिंहगड पब्लिक स्कूल च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.शाळेचे प्राचार्य एन.के. मिश्रा यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :