ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवाची जंगी तयारी, पाव्हणं जेवलात का? सगळचं डेअरीला घालु नका! यवत चा पठ्या तयार होऊ द्या

By : Polticalface Team ,02-02-2023

ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवाची जंगी तयारी, पाव्हणं जेवलात का? सगळचं डेअरीला घालु नका! यवत चा पठ्या तयार होऊ द्या दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०२ फेब्रुवारी २०२३ यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता महालक्ष्मी यात्रा उत्सव रविवार दि ५ जानेवारी ते सोमवार दि ६ जानेवारी २०२३, यात्रा उत्सव व्यस्थापक देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ यवत ता दौंड जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणार आहे.

यात्रा उत्सवात सालाबाद प्रमाणे यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता महालक्ष्मी देवस्थान यात्रा उत्सव निमित्ताने प्रमुख आकर्षित कार्यक्रम रविवार सकाळी ५ ते ६ या वेळेत श्री काळ भैरवनाथांची महापूजा व अभिषेकाने सुरुवात होणार असुन यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्ट यात्रा व्यवस्थापक सर्व मांन्यवर मंडळी एकत्रित येऊन सार्वजनिक सांस्कृतिक पारंपारिक गाव यात्रेतील कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात, यवत गावचे ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ महालक्ष्मी माता पूर्वकालीन नाथपंथी परंपरा व गाव प्रति आदर सन्मान जपुन प्रत्येक व्यक्ती युवा तरुण लहान थोर मंडळी बारकाईने आपली जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात, यात्रा उत्सव निमित्ताने विविध सांस्कृतिक पारंपारिक आकर्षित कार्यक्रमात सहभाग घेऊन यात्रेची रंगत शोभा वाढविण्यासाठी युवा तरुण संपूर्णपणे कार्य करीत असतात.

श्री काळभैरवनाथांची गाव प्रदक्षिणा काट्यांची भव्य मिरवणूक, छबीना दरम्यान उत्कृष्ट फटाक्यांची सुंदर आतिषबाजी करून, सांप्रदायिक भजनी मंडळ, ढोल ताशा लेझीम पथक, पारंपारिक वाद्य पथक मावळ्यांचा मर्दानी खेळ, छडी पट्टा, असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, या वेळी छबीना दरम्यान ढोल लेझीम वाद्य पथकातील आकर्षित जुगल बंदीच्या खेळात कलगीतुरा रंगला जाईल, यामधील तीन पथकांची निवड करण्यात येणार असून,उत्कृष्ट कलाकृती व गुणांचे निरीक्षण करून प्रथम द्वितीय तृतीय पथकांची निवड करण्यात येणार आहे क्रमांक पटकवणाऱ्या पथकांचा आदर पूर्वक संन्मान व योग्य पारितोषिक व्यवस्थापक समस्त ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्ट मान्यवरांच्या हस्ते विजयी पथकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यवत पंचक्रोशीतील तमाशा रशिक प्रेक्षकांसाठी लोकप्रसिद्ध असलेला तमाशा रविवारी रात्री कलाभुषण मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम, (पाव्हणं जेवलात का?) गण गवळण बतावणी रंगबाजी मनमोहक अदाकारी यवत पंचक्रोशीतील सर्व तमाशा रसिकांसाठी (पाव्हणं जेवलात का?) मनोरंजन होणार आहे, तसेच दुसऱ्या दिवशी सोमवार सकाळी, ८ ते दुपारी १ वाजे,पर्यंत रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा हजऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे.

यवत गावचे ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ व माता महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने सोमवार दि ६ रोजी दुपारी ४ ते ७ या वेळी मैदानात कोल्हापुरी बाणा नामांकित पैलवानांचा रंगणार आखाडा, सगळचं डेअरीला घालु नका यवत चा पैठ्या तयार होऊ द्या? पंच मंडळी आणि समितीचा अंतिम निर्णय, पैलवान खेळ दाखवा कुस्ती चितपट झाली तरच इनाम.

यवत यात्रेच्या निमित्ताने व्यवस्थापक समस्त ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट समिती पदाधिकारी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे नुकतेच आलेले पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट घेऊन यवत गावच्या यात्रे संदर्भात माहिती दिली, या वेळी बोलताना म्हणाले ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी मातेची यात्रा आनंदात पार पडावी, सर्वांनी यात्रेचा आनंद घ्यावा, यात्रेला गालबोट लागेल असे परिणाम निर्माण होऊ नये, याची खबरदारी युवा तरुण व सर्वांनीच घ्यावी, वावगे परिणाम दिसुन आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष