अपूर्ण घरकुलांसंदर्भात दि. ७ व ८ रोजी पंचायत समिती सभागृह, करमाळा येथे सुनावणी कॅम्प; मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा…

By : Polticalface Team ,05-02-2023

अपूर्ण घरकुलांसंदर्भात दि. ७ व ८ रोजी पंचायत समिती सभागृह, करमाळा येथे सुनावणी कॅम्प; मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा… करमाळा प्रतिनिधी अलीम शेख पंचायत समिती करमाळा अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०१६-२०१७ ते सन २०२१-२०२२ अखेर एकूण ४२७७ एवढे घरकुले मंजूर आहेत. या मंजूर घरकुलापैकी ७३४ घरकुलाचे करारनामे अपूर्ण आहेत. मंजूर घरकुलांपैकी २५२८ एवढी घरकुले पुर्ण आहेत. तसेच १७५६ एवढी घरकुले अपुर्ण आहेत. सदर अपूर्ण घरकुलां बाबत मा. अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र जा.क्र.१४९/ योजना-१० दिनांक २८/११/२०२२ अन्वये ज्या घरकूल लाभार्थीना घरकुल बांधणेसाठी जागा उपलब्ध होवू शकत नाही, असे लाभार्थी रिमांड (घरकुल प्रतिक्षा यादीतून कायमस्वरुपी वगळणे) करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. तसेच घरकुले ३१ मार्च २०२३ अखेर पुर्ण करुन घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. ३१ मार्च २०२३ नंतर घरकूल अपुर्ण राहिल्यास शासनाकडून लाभार्थीस अनुदान मिळणार नाही. त्यानंतर सदर अपुर्ण घरकुल हे लाभार्थीस स्वखर्चाने पुर्ण करुन घ्यावे लागणार आहे. त्यानुषंगाने दिनांक ०३/०२ / २०२३ रोजी सर्व ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांची आढावा बैठक होऊन ज्या घरकुल लाभार्थीचे घरकुल अपुर्ण आहेत, त्यांची पंचायत समिती गण निहाय सुनावणी कॅम्प दिनांक ०७/०२/२०२३ व दिनांक ०८/०२/२०२३ रोजी पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेले आहेत. सदर कॅम्पला जे लाभार्थी गैरहजर राहतील त्यांच्या बाबत एकतर्फी निर्णय घेवून सदर घरकुल रद्द करणेत येईल तसेच शासकीय निधीचा दुरुपयोग केला म्हणून फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहीती गटविकास अधिकारी मनोज राऊत (वर्ग-१) पंचायत समिती, करमाळा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी