श्रीगोंदा तालुक्यातील नगर - दौंड रस्त्यावरील लोणी व्यंकानाथ रेल्वे गेट ते लोणी गाव हा 2 किमी रस्ता अनेक वर्षापासुन अपूर्ण होता . त्यामूळे अनेकांना अपघातात आपला जीव गमावावा लागला . या काम पूर्तेतेसाठी अनेक आंदोलनं झाली . रास्तारोको करण्यात आले . लोकं भावना व होणारे अपघात लक्षात घेत खासदार डॉ . सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा करून , सदर रस्त्याच्या कामासाठी केंद्रातून सुमारे 3.5 कोटी रुपये मंजूर करून आणले . आज सकाळी 10:30 वाजता लोणी व्यंकानाथ गावात खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते हा भूमिपूजन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा राज्य बाजार समितीचे प्रवीणकुमार उर्फ बाळासाहेब नाहटा तसेच नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाजपचे ad बाळासाहेब काकडे यांचा खा . डॉ विखे यांच्या समोरच श्रेय वाद सुरु झाला .ad काकडे नाहटा यांना उद्देशून म्हणाले की , राष्ट्रवादीचा भामटा म्हणतोय विकास निधी मीच आणलाय . त्यावर नाहटा व नाहटा समर्थक कार्यकर्ते आक्रमक होऊन काकडे यांच्या दिशेनं धावले . त्यांनतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते डॉ . विखे यांच्या समोरच शिवीगाळ करत भिडले आणि भूमिपूजन कार्यक्रमांत एकच गोंधळ उडाला .
वाचक क्रमांक :