दौंड शहरातील सावकारांच्या जाचाला वैतागून, विशाल दुमावत याचा विषारी औषध पिऊन मृत्यू, ९ इसमांन विरुद्ध गुन्हा दाखल
                      
                
            
               By : Polticalface Team ,06-02-2023
       
               
                           
              दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता, ०५/फेब्रुवारी २०२३ दौंड शहरातील भांड्याचे दुकानदार विशाल शांतीलाल दुमावत वय ३७ वर्ष रा, आंबेडकर चौक, दौंड जिल्हा पुणे, याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून दि,२९/जानेवारी २०२३ रोजी राहत्या घरी कॅनोन नावाचे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याने खळबळ उडाली आहे, विशाल दुमावत यांची पत्नी, फिर्यादी सौ संगीता विशाल दुमावत वय ३२ वर्ष रा दौंड, यांच्या तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे गु, रजि नं ८२/२०२३ भा.द.वि कलम, ३०६, ५११, ३२३, ५०४, ५०६, ३४, सह महाराष्ट्र सावकारी अधि २०१४ चे कलम,३९, ४५, कायद्यानुसार संबंधित  ९ इसम सावकारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामधील
आरोपी-1)निलीमा गायकवाड, 2)बाबू, शेख, ३)नाड़ी भैय्या, 4)राजू सूर्यवंशी, 5)मुन्नी काजी व तिचा मुलगा 6)टिन काजी, 7) नितीन पक्से, 8) रूपेश जाधव पूर्ण नीचे माहित नाहीत 9) इतर इसमाची नावे माहित नाही सर्व रा. दौंड ता. दौंड जि. पुणे, येथिल रहिवासी असुन फिर्यादी यांचे पति विशाल याने भांडयाचे दुकानासाठी गेली चार वर्षापूर्वी दौड मधील व्यक्तींनकडून व्याजाने पैसे घेतले होते असे नमूद करण्यात आले आहे.
 फिर्यादी यांचे चुलत दिर अमन अमृतनाल दुमावत रा.दौड ता.दौड जि.पुणे यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की, विशाल ने कॅनोन नावाचे विषारी औषध पिले आहे, व त्याला महालक्ष्मी हॉस्पिटल दौड येथे अँडमीट करण्यात आले असल्याचे समजले असल्याने दि,३०/०१/२०२३,रोजी सकाळी ६, वा,सु, बैलूरु कर्नाटक येथून दौंड येथे रेल्वेने आले, त्यावेळी महालक्ष्मी हस्पिटल दौड येथे गेले असता माझे पति हे वेन्टीलेटरवर बेशुध्द अवस्थेत दिसुन आले, मात्र उपचार दरम्यान  विशाल दुमावत याचा मृत्यू झाला आहे.
विशाल दुमावत यांनी आमचे शहा बाबुलाल करण राज या भांड्याचे दुकानासाठी दौंड मध्ये राहणारे १)निलीमा गायकवाड, २)बाबू शेख, ३)नाडी भैय्या, ४)राजू सूर्यवंशी, ५)मुन्नी काजी व तिचा मुलगा, ६)टिल्लू काजी, ७) निखील पळसे, ८) रूपेश जाधव पूर्ण नावे माहित नाहीत, ९)इतर अनेक इसमाची नावे माहित नाही. यांचेकडून गेली चार वर्षापूर्वी, २५,००,०००/- लाख रूपये व्याजाने घेतले होते. मात्र पति विशाल यांनी त्यांचे मुद्दल घेतलेले सर्व पैसे व व्याजाची रक्कम असे रोजचे रोज आमचे भांडयाचे दुकानाचा झालेल्या गल्यातून तसेच ऑनलाईन फोन पे, द्वारे देत होते, परंतु वरील इसमांनी विशालकडे अधिक पैसे येणे बाकी असल्याचे सांगत आम्हाला आणखी पैसे तुमचेकडे येणे बाकी आहे, असे म्हणून वारंवार आमचे दुकानात येऊन पति विशाल व आम्हाला शिवीगाळ करून जीवे भारण्याची धमकी देते होते तसेच फोन करून दमदाटी करीत होते व त्यांनी  विशाल कडुन बळजबरीने व मारहाण करून कोरे चेक वर सहया घेतल्या आहेत, तसेच कोरे स्टॅम्प पेपरवर ही सहया घेतल्या आहेत, विशाल याला वरील इसम हे मानसीक, शारीरीक त्रास देवून, फोन करून तसेच आमचे दुकानावर येवून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत असल्याने त्यांचे त्रासाला कंटाळून राहते घरी, विशाल शांतीलाल दुमावत,यांने दि,२९/०१/ २०२३, रोजी सकाळी ०९.वा चे सु,कॅनॉन नावाचे विषारी औषध पिले आहे, त्यापूर्वी  विशालने त्यांचे मोबाईल मध्ये दारवार पैशाकरीता त्रास देणा-या इसमाची नावे घेवुन व्हीडीओ रेकार्डीग केले असल्याचे व्हीडीओ मी सादर करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे, सदर प्रकरणी दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी पो. स. ई/गोसावी, तपासी अधिकारी - सपोनि राठोड पुढील तपास करीत आहेत.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष