श्रीगोंदा मधील मागासवर्गीय संघटना व पुरोगामी विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे निवेदन.
By : Polticalface Team ,07-02-2023
श्रीगोंदा तालुक्यामध्ये दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी संत शेख महंमद बाबांच्या दर्गामध्ये सर्व मागासवर्गीय संघटना व पुरोगामी विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक झाली . अॅट्रॉसिटी कायदा वापर , गैरवापर या वर ही चर्चा झाली. 27 जानेवारी 2023 रोजी सर्व पक्षनेते एकत्रित होत केलेला गावबंद व निषेध सभेमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या दलित समाजविरोधी घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला .या बैठकीसाठी सामाजिक कार्यकर्ते बंडू तात्या जगताप , पत्रकार मिराताई शिंदे , संतोष शिंदे , नितीन जावळे , ऑल इंडिया पँथर सेनेचे अमर घोडके , नितीन शिंदे , योगेश गंगावणे , प्रकाश घोडके , राहुल छत्तीसे , भाऊसाहेब शिंदे , प्रकाश लोंढे , जिल्हा परिषदचे माजी सदस्य अनिल ठवाळ इत्यादींसह बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार ढोले मॅडम व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना देण्यात आले . अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले आहे . निवेदनात म्हटले आहे कि , दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या शहर बंद व निषेध सभेत शहरातील दोन गटातील तरुणांच्या हाणामारी प्रकरणास सामाजिक स्वरूप देऊन , गावातली सलोख्याचे वातावरण दूषित केले आहे . मारामारी प्रकरणाबाबत स्वतः प्रशासन फिर्यादी होऊन , परस्पर गुन्हे दाखल झाले . असे असतानाही व प्रशासनाची मोर्चा व सभेला परवानगी नसताना केवळ आरोपी मागासवर्गीय समाजातील असल्यामुळे त्याच्या विरोधात गावातली नेते व प्रमूख कार्यकर्ते एकत्र येऊन दलीत समाजावर दबाव तंत्राचा वापर केला
निवेदनात म्हटले आहे की सभेमध्ये कोपर्डी प्रकरणाचा वारंवार उल्लेख करून , दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि चिथावणी देण्याचा प्रयत्न केला . माध्यमांतून सामजिक माध्यमात काही व्यक्तींनी अपरोक्ष व असंविधानिक वक्तव्य केले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी . सभेत प्रमूख नेते व आयोजक यांनी आम्ही काही सात महिन्यांचे नाहीत . वेळ आली तर जीव घेऊ . अश्या प्रकारे सार्वजनिक ठिकाणी भर सभेत विशिष्ठ जात समूहाला धमकी दिल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली . ॲट्रॉसिटी कायद्याबाबत गरळ ओकणाऱ्या पदाधिकऱ्यांचा निषेध करण्यात आला . दोन गटात मारामारी झाल्यानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले , त्यामूळे शहरासह तालुक्यात तणावपूर्ण वातावरण तयार झाले असताना . काहींनी सामजिक माध्यमातून जुने व्हिडिओ , फोटो व वेगवेगळ्या पोस्ट टाकून दलिता समाजा विरुध्द सवर्ण समाजाच्या भावना भडकवण्याचा व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला . त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेल्या सर्व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी .
दिनांक 27 जानेवारी 2023 रोजीचा बंद , मोर्चा व निषेध सभेत " हम सब एक है " चा नारा दलीत समाजा विरोधात विद्यमान आमदार यांच्या समोर देण्यात आला . याचा समाज बांधव निषेध करत आहेत .तशेच नमूद प्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासन व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घेतलेल्या योग्य भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे . पिडीतांकडून ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल झाल्यावर गैर संविधानिक जमाव जमवून सभा आयोजित करनाच्या विरुध्द यापुढे ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात यावेत . अश्या विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहे . बैठकीत बहुजन सलोखा कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे . या माध्यमातून सर्व पुरोगामी व आंबेडकरवादी संघटना येत्या काही दिवसांत मागासवर्गीय समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात भव्य मेळाव्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.