यवत गावचा कुस्ती आखाडा जोरदार! शेवटची कुस्ती, १ लाख ५१ हजार,
महाराष्ट्र केसरीचे मानकरी
शिवराज राक्षे विरुद्ध सागर बिराजदर
By : Polticalface Team ,07-02-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०६ फेब्रुवारी २०२३ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता महालक्ष्मी यात्रा उत्सव रविवार दि,०५ ते सोमवार दि,०६ रोजी यात्रेचे रोषणाई वातावरण निर्माण होऊन बाजार पेठ गजबजुन गेली होती, श्री काळभैरवनाथ महालक्ष्मी माता देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती,गाव कारभारी मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनाची चर्चा स्तुती केली जात आहे, श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी माता मंदिराची आकर्षित विद्युत रोषणाई, तसेच पारंपरिक छबीना पालखी, देवाच्या काठ्यांची मिरवणूक ढोल ताशा वाद्य लहान मोठ्या पथकांची जुगल बंदीचा आनंद ग्रामस्थांनी मनसुक्त घेतला, पंचक्रोशीतील नागरीकांनी गाव आखाड्यात मोठी गर्दी केली होती प्रमाणात सहभाग नोंदवला होता, पुणे जिल्ह्यातील नामांकित पैलवान महाराष्ट्र केसरीचे मानकरी पैलवान शिवराज राक्षे,आणि महाराष्ट्र उपकेसरीचे मानकरी पैलवान सागर बिराजदार यांनी आखाड्यात प्रवेश करतात नागरीकांनी जल्लोष व्यक्त केला, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जोरदार आखाडा पहिलवानांच्या उपस्थितीत गजबजून गेला होता, गावकरी ही रंगात आले होते, गावकऱ्यांच्या नजरा भिडण्या आधीच पैलवान कुस्ती मारत होते, त्यामुळे समस्त ग्रामस्थ गावकरी मोठ्या प्रमाणात इनाम घोषित करून कुस्ती प्रदर्शनाचा आनंद घेत होते,
अंतिम वेळी समस्त ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट पंच मंडळींनी पाच उत्कृष्ट पैलवानांच्या कुस्त्या घोषित केल्या त्यापैकी चार कुस्त्यांनी चांगलाच आखाडा रंगतदार कुस्तीचे जंगल पकड पाहायला मिळाली.
१) नामदेव कचरे विरुद्ध किसन भागवत, तर पुणे जिल्ह्यात गाजलेले नामांकित पैलवान यवत गावची शान २) मंगेश दोरगे विरुद्ध संतोष नरुटे या कुस्तीने यवत गावातील समस्त ग्रामस्थांना हैरान केले पैलवान मंगेश दोरगे याने बघताबघता कुस्ती चितपट मारली असल्याने आनंदाने जल्लोष करण्यात आला ३)हमीद पटेल विरुद्ध किसन सावंत ४) राहुल दिवेकर विरुद्ध दादा मजगुणे या अंतिम महाराष्ट्र केसरी प्रसिद्ध पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध महाराष्ट्र उपकेसरी प्रसिद्ध पैलवान सागर बिराजदार दोघे कुस्तीच्या मैदानात आखाड्यात उतरले त्यांनी जमलेल्या समस्त गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल असा प्रश्न समस्त ग्रामस्थांना पडला होता,यवत गावातील ग्रामस्थांनी शेवटच्या कुस्तीला प्रोत्साहन देऊन देवस्थान आणि देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ यात्रा समिती सदस्य यांनी १लाख ५१ हजार रुपये शेवटची कुस्तीचे घोषित केले, महाराष्ट्र केसरी पदाचे मानकरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध महाराष्ट्र उपकेसरी पदाचे मानकरी पैलवान सागर बिराजदार दोघेही भिडले गावकऱ्यांनी बाबतीत करत समान कुस्ती घोषित केली, पैलवान शिवराज राक्षे आणि सागर बिराजदार यांचा घोषित इनाम श्री काळभैरवनाथ मंदिर येथे यात्रा उत्सव समिती सदस्य खंडुदादा दोरगे दोरगे, आणि पंचायत समिती सदस्य मा कुंडलिक खुटवड यांच्या हस्ते श्रीफळ आणि घोषित इनाम देऊन सत्कार करण्यात आला,
यात्रेतील छबीना दरम्यान पारंपारिक वाद्याने समस्त ग्रामस्थ नागरीक भारावुन गेले होते, ढोल ताशा पथक पारंपारिक उत्कृष्ट वाद्य पथकांनी आपल्या खेळाची उत्कृष्ट प्रदर्शनाची ढोल ताशा पथकांची निवड करण्यात आली, त्यांना पाच ते सात हजार रुपये चार पथकांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले, रात्रीच्या मनोरंजनात कलाभुषण मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा कार्यक्रम हजऱ्यासह विना वादविवाद न होता यात्रा जोरदार झाली.
सेवा मार्गातील व बाजार पेठेतील वाहतूक कोंडीने नागरिकांची दमछाक झाली होती, बाजार पेठेतील मुख्य चौकात रस्ता चक्का जाम होता, देवाच्या काठ्यांची मिरवणूक दरम्यान सेवा मार्गातील वाहतूक कोंडीचा प्रश्न नागरीकांची डोकेदुखी ठरत होती.
बाजार मैदान परीसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते, तमाशा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित हजारो पै पाहुणे यांनी व गावातील ग्रामस्थांनी या विषयावर नाराजी व्यक्त केली आहे, यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्वच्छता अभियान राबवणे अपेक्षित असताना देखील याकडे समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, ओढ्यातील दुर्गंधीचा दूरपर्यंत आदर्श गेला असावा अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील नामांकित पैलवान यवत यात्रेच्या आखाड्यात सहभागी झाले होते, यवत गावातील समस्त ग्रामस्थ यात्रा समिती सदस्य,देवस्थान ट्रस्ट यांच्या उपस्थितीत आखाड्यातील पंच मंडळी पैलवान जोड धरुन आऐका लोक म्हणत पैलवानाचे नाव गाव सांगुन लढत लाऊन कारभारी लक्षपूर्वक निरीक्षण करत अंतिम टप्प्यात विजयी तर कधी बराबरीत समान कुस्ती कारभारी घोषित करत होते, वरवंडची महिला पैलवान कु मनिषा दिवेकर हिला आखाड्यात न खेळताच इनाम देऊन गौरविण्यात आले, यवत आखाड्यात आलेल्या नागरिकांचे डोळे दिपावेत असे पैलवान कुस्तीतील डाव खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याने उपस्थित कुस्ती चाहते पैलवानांना स्फूर्ती देऊन आनंद व्यक्त करत होते.
या प्रसंगी समस्त ग्रामस्थ यात्रा समिती अध्यक्ष व यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सदानंद वामन दोरगे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतिश कोडीबा दोरगे, नानासाहेब दोरगे, दिलीप यादव, कैलास दोरगे, रमेश जैन,माजी सरपंच दशरथ खुटवड, शंकर दोरगे, दत्तात्रय दोरगे, पंडीत दोरगे, दिलीप दोरगे, संजय दोरगे, अशोक दोरगे, दादा चंद्रकांत दोरगे,आदी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष