ढवळगाव चे सरपंच विजय शिंदे यांच्यावर गावच्या यात्रेच्या दिवशी प्राणघातक हल्ला
By : Polticalface Team ,08-02-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी ;-
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील विद्यमान सरपंच प्रतीक्षा विजय शिंदे यांचे पती ढवळगाव चे माजी सरपंच विजय मारुती शिंदे यांच्या वरती मंगळवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ढवळगाव येथील हॉटेल अभिच्या मागच्या बाजुस मित्रासंगे बोलत उभे असताना अचानक मोटरसायकल वरती ऋषिकेश रामदास ढवळे, सागर राधु ढवळे या दोघांनी येऊन मा.सरपंच विजय शिंदे यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर ऋषिकेश रामदास ढवळे, सागर राधु ढवळे, त्या ठिकाणावरून पळून गेले सदरील ठिकाणी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस कोळपे साहेब,गुंड साहेब, यांनी सदर ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
वाचक क्रमांक :