पत्नीस जिवे ठार मारल्या प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा

By : Polticalface Team ,11-02-2023

पत्नीस जिवे ठार मारल्या प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा श्रीगोंदा : भाऊसाहेब दत्तु शेळके , रा . शेळकेवस्ती , ता . कर्जत , जि . अहमदनगर याने पत्नीस जिवे ठार मारल्या प्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री . एन . जी . शुक्ल साहेब यांनी भा.द.वि. ३०२ अन्वये आरोपी यास दोषी धरले त्या नुसार ३०२ अन्वये जन्मठेप तसेच रक्कम रुपये १५००० / - रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे साधी कैदेची शिक्षा तसेच ४ ९८ अ नुसार ३ वर्षे शिक्षा तसेच रक्कम रु ५००० / - दंड दंड न भरल्यास ६ महीने साधी कारावास शिक्षा सुनावली . श्रीगोंदाः- रणवीर श्रीनाथ सव्वासे यांची बहिण रुपाली भाऊसाहेब शेळके रा . बहिरोबावाडी ता . कर्जत , जि . अहमदनगर हिचा दिनांक ०१/०७/२०१२ रोजी उशीने तोंड दाबलेने तिचा गुदमरुन मृत्यु झालेने त्याच दिवशी त्यांनी कर्जत पोलीस टेशनला भा.द.वी. कलम ४ ९ ८ अ , ३०२,५०४,५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता . या बाबत हकीकत अशी की , रुपाली हिचा विवाह दिनांक १३/१०/२०११ रोजी आरोपी भाऊसाहेब दत्तु शेळके यांचे सोबत झाला होता तेंव्हा आरोपी हा तिचे चारीत्र्यावर संशय घेऊन , छळ , जुलुम करुन मारहाण करीत असलेबाबत ती माहेरी सांगत असे . या बाबत त्यास वेळोवेळी त्रास देवू नको असे समजवून सांगितले होते . दिनांक ०१/०७/२०१२ रोजी फिर्यादीस घटनेबाबत माहिती मिळाली असता शेळकेवाडी येथे आला असता त्याला रुपाली ही मयत झाल्याचे तसेच तिचे गळयास व्रण दिसला म्हणुन त्याने आरोपी विरुध्द फिर्याद दिली . सदरची घटना आठ महिण्यातच घडली होती . सदरचे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास चालु असताना यातील मयताची चिठ्ठी ही पोलीसांपूढे हजर केली . त्या अनुशंगाने तपास करताना मयताने तिचे जिवास आरोपी कडुन धोका असल्याचे लिहुन ठेवले होते . सदरचे गुन्ह्याचा तपास करुन यातील आरोपी विरुध्द दोषारोप पत्र दाखल केले होते .

सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपी विरुध्द सपोनि आर . बी . शिंदे साहेब यांनी मा . न्यायालयात देषारोपपत्र दाखल करण्यात आले . सदर खटल्याची सुनावणी मा . जिल्हा न्यायाधीश २ श्री . एन . जी . शुक्ल साहेब यांच्या न्यायालयात झाली . सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने १ रणविर अजिनाथ सध्वासे फिर्यादी २. रेखा चंद्रशेखर गांगर्डे ३. जालींदर देवराव शेळके मयताचे मामा ४. रविंद्र शिवाजी कानगुडे पंच ५. डॉ सुचेता यादव ६ विनयकुमार माने हस्ताक्षर तज्ञ ७. रविंद्र बाबाजी शिंदे तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या . सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील अनिल एम . घोडके यांनी काम पाहिले . मा . न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा . न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली . पैरवी अधिकारी सौ . आशा खामकर यांनी सहकार्य केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.