पेडगावचे सुफी संत श्री शहामुनी एक संशोधन... लेखक व संशोधक :- कृष्णा भगवान घोलप (पेडगाव, तालुका: श्रीगोंदा, जिल्हा: अहमदनगर)

By : Polticalface Team ,12-02-2023

पेडगावचे सुफी संत श्री शहामुनी एक संशोधन...                       लेखक व संशोधक :- कृष्णा भगवान घोलप             (पेडगाव, तालुका: श्रीगोंदा, जिल्हा: अहमदनगर) प्रस्तावना :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव हे पूर्वीपासूनच एक ऐतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते. भीमा सरस्वती नद्यांच्या संगमावर पेडगाव वसलेले आहे. बारा वेशी, बारा मारुती व बावन्न पेठांचे हे गाव होते. या ठिकाणी खूप मोठी बाजारपेठ होती. याचे अनेक पुरावे पेडगावच्या बहादुरगड उर्फ धर्मवीर गड या भुईकोट किल्ल्यावर मिळतात. वेड घेऊन पेडगावला जाणे अथवा पेडगावचे शहाणे या म्हणींचे उगमस्थान देखील हीच भूमी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्री छत्रपती संभाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून आज पेडगाव सुपरिचित आहे. अशा प्रकारे या गावाला ऐतिहासिक वारसा पूर्वीपासूनच लाभलेला आहे. त्याचबरोबर या भूमीला एका अध्यात्मिक अधिष्ठानाचा सुद्धा वारसा लाभलेला असू शकतो. तो नेमका कसा ते पाहूया.

आपल्या महाराष्ट्राला सुफी संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. ऐक्य भावाचे ते प्रतीक मानले जातात. श्रीगोंदाचे श्री संत शेख महंमद महाराज हे एक जवळचेच उदाहरण घेता येईल. महाराष्ट्रातील अशाच सुफी संतांच्या परंपरेमध्ये श्री संत शहामुनी होऊन गेले. त्यांना संत कवी म्हणून सुद्धा संबोधन आहे. शहामुनी हे पेशवाईच्या काळात होऊन गेल्याचे अनेक पुरावे सापडतात. शके सतराशे मध्ये शाहामुनी यांनी श्री सिद्धांत बोध या ओवीबद्ध मराठी प्रकृत ग्रंथाची रचना केली अद वैतज्ञानाचे व सद्गुरू भक्तीचे वर्णन करणारा हा ग्रंथ आहे. रा. पांगारकर असे म्हणतात की, हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेतील एक तेजस्वी हिरा आहे. अनेक उपमा व अलंकारांनी हा ग्रंथ शहामुनी यांनी मढविलेला आहे. संशोधनाची बाब ही आहे की, या ग्रंथाच्या ३६ व्या अध्यायामध्ये श्री शहामुनी स्वतःचा कुलवृत्तांत वर्णन करतात. तेव्हा ते स्वताच्या जन्म स्थलाबाबत ही वर्णन करतात. त्याबाबत ग्रंथात अशी ओवी आलेली आहे--
भीमा तटी पेडगाव शहर I पूर्वेस सरस्वती संगम साचार I तेथे ताई मातेचे पवित्र उदर I जन्म दिला आम्हासी II ( सि. बो. ३६ /१०)

या ओवीतील स्थल वर्णन पाहिले तर तंतोतंत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावशी जुळते आहे. भिमातटी पेडगाव आहे. पूर्व दिशेला सरस्वती संगम आहे. शहामुनींनी ओवी मध्ये पेडगाव चा “शहर” असा उल्लेख केलेला आहे. हे एक ऐतिहासिक गाव आहे. या ठिकाणी ५२ पेठांची मोठी बाजारपेठ होती. तेव्हा नक्कीच तत्कालीन समयी पेडगाव हे शहर असणार आणि शहामुनी त्यांच्या जन्मस्थळाचे जे वर्णन करतात. ती भूमी देखील हीच असावी. असा विश्वास वाटू लागतो. अभ्यासांती, संशोधना अंती लक्ष्यात येते . तरीसुद्धा जाणत्या मंडळींनी, मोठ्या इतिहासकार व संशोधकांनी या विषयावर सखोल व सूक्ष्म असे संशोधन करावे. कारण मी देखील काही इतिहासाचा गाढा अभ्यासक नाही. किंवा मोठा संशोधक नाही. परंतु ही माहिती मिळाली. आपल्या मातृभूमीचा त्यात उल्लेख असल्याने माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यातून काही अंशी संशोधन घडले. जे मला समाजापर्यंत पोहोचवणे उचित वाटते.

संशोधना संबंधी माझी पार्श्वभूमी :- योगायोगाने म्हणा किंवा कसेही परंतु लहानपणापासून माझा श्री सिद्धांत बोध या ग्रंथाशी संबंध आहे. आमच्या कुटुंबामध्ये अध्यात्माची मेढ आमच्या आजीने (हिराबाई बबन घोलप) रोवली. सध्या तिने वयाची नव्वदी पार केलेली आहे. अशिक्षित असताना सुद्धा ती ग्रंथ पोथी पुराण वाचायची. तिच्या संग्रही सिद्धांत बोध हा ग्रंथ होता. अशाप्रकारे श्रीशहामुनींच्या चरित्राशी, त्यांनी लिहिलेल्या सिद्धांत बोध ग्रंथाशी माझा संबंध आला. त्यातील श्री शहामुनी यांच्या जन्मभूमीचे वर्णन तंतोतंत आपल्या गावाशी जुळते आहे. हे उमगल्यावर सुरू झाला संशोधनाचा प्रवास!

सुफी संत श्री शहामुनी :- महान सुफी संत श्रीशहामुनी यांचा जन्म शके १६७०ला चैत्र वैद्य अष्टमीला भीमा तटी असणाऱ्या व पूर्व दिशेस सरस्वती संगम असणाऱ्या पेडगाव या गावी झाला. काशी या ठिकाणी शहामुनी यांना श्रीगुरु मुनिद्र यांनी उपदेश केला. श्रीमुंनिन्द्र यांना स्वतः श्री गुरु दत्तात्रयांचा उपदेश होता. शाहमुनी यांचे मूळ नाव शहाबाबा किंवा शहाहुसेन असे होते. संत एकनाथांनी ज्याप्रमाणे आपल्या गुरुच्या आदरास्तव ‘एका जनार्दनी’ या नावाने अभंग रचना केली त्याचप्रमाणे आपल्या श्री गुरु मुनिंद्र यांच्या सन्मानार्थ शहा हुसेन यांनी ‘शहामुनी’ हे नाव धारण केले. संत शेख महंमद यांच्या प्रमाणेच शहामुनी देखील श्री संत कबीरांना आपल्या गुरुस्थानी मानतात. ते म्हणतात ऐसा कबीर जगी धन्य I माते स्वप्नी दिले दर्शन I तोही गुरु माझा पूर्ण I जपे त्यासी अहर्निशी II त्यांनी महान अशा श्री सिद्धांत बोध या ग्रंथाची रचना केली व आपली लेखणी सद्गुरुला समर्पित केली. जालन्यापासून ५७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शहागड या ठिकाणी श्री संत शहामुनी यांची समाधी आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक व श्रद्धाळू येत असतात. परंतु श्री शहामुनी यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पेडगाव येथे त्यांचे स्मरण होईल असे काहीच नाही. अद्याप येथील समाज या गोष्टीपासून अज्ञात आहे. तेव्हा संशोधनकर्त्यांनी उपरोक्त माहितीचे उचित असे संशोधन करून, आम्हास उचित असे मार्गदर्शन करावे ही विनंती.

श्री शहामुनि रचीत श्रीसिद्धांतबोध ग्रंथ :- श्री संत कवी शहामुनी यांनी शके सतराशेला सिद्धांत बोध या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथाचे एकूण ५० अध्याय असून ओवी संख्या ९८५८ आहे. या ग्रंथातून श्रीशहामुनी यांची सद्गुरु भक्ती व श्रीकृष्ण भक्ती दिसून येते या ग्रंथात शहामुनी रामायण, महाभारत, भागवत, गीता, वेद अशा अनेक गोष्टींचा व कथांचा ऊहापोह करतात. अत्यंत रसाळ, अलंकारिक भाषा सौंदर्य, अनेक विविध उपमा व नवरसांनी युक्त असा सिद्धांत बोध ग्रंथ आहे. श्रीशहामुनी यांनी हा ग्रंथ शके सतराशेत चांबळी जवळील पठारी मंडण येथे लिहून पूर्ण केला. ज्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचे काम श्री सच्चिदानंद बाबा यांनी केले त्याप्रमाणे शहामुनींचे शिष्य श्री भगवंत नारायण पांढरकामे हे श्री सिद्धांत बोधाचे लेखक जाहले.

संशोधनाची गरज व आराखडा : सुफी संत श्री शहामूनी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावी झाला असा स्पष्ट उल्लेख एका नाही तर अनेक ठिकाणी सापडतो. तोही लेखी स्वरूपामध्ये परंतु एक गोष्ट थोडी संदिग्धता निर्माण करू शकते. ती म्हणजे सिद्धांतबोध कथासारच्या एका प्रतीतील प्रस्तावनेमध्ये पुणे जिल्ह्यातील पेडगाव असा उल्लेख सापडतो. ते पेडगाव भीमेच्या पैलतीराला असून ‘धाकटे पेडगाव’ म्हणून ओळखले जाते. परंतु थेट मूळ ग्रंथ श्री सिद्धांतबोधातील स्वतः शहामुनींनी त्यांच्या जन्मस्थानाविषयीकेलेले ओवीबद्ध वर्णन पाहिले तर ते श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावास सर्वथा लागू पडते असे दिसते. मग ते पूर्व दिशेला असणाऱ्या सरस्वती संगमाचे असो किंवा पेडगावचा केलेला ‘शहर’ असा उल्लेख असो, किंवा इंटेरनेटवर आणि अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील ‘पेडगाव’ ही श्री संत शहामुनी यांची जन्मभूमी आहे असे स्पष्टच उल्लेख आहेत. ज्यांची संदर्भ सूची मी या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. तेव्हा या गोष्टीचे सूक्ष्म परीक्षण, संशोधन होणे गरजेचे आहे. खरोखर सर्वांच्या अभ्यास व संशोधन्वरूपी प्रयत्नातून जर श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव हीच सुफी संत श्रीशहामुनी यांची जन्मभूमी आहे असे सिद्ध झाले, त्यावर सर्वांचे एकमत झाले, आणि ही गोष्ट प्रमाणित होऊन त्यास शासनमान्यता प्राप्त झाली तर, आपले पेडगाव हे भविष्यात ‘श्रीक्षेत्र पेडगाव’ म्हणून नावारूपास येईल! याचा मला देखील इतरांप्रमाणे एक ग्रामस्थ म्हणून खूप आनंद होईल. पेडगाव मध्ये होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे वेळी श्री शहामुनी विरचित श्री सिद्धांत बोध या ग्रंथाचे पारायण आवर्जून करता येईल. श्री शहामुनी यांचा त्यांच्या जन्म तिथीस जन्मसोहळा साजरा करता येईल. असो पेडगाव मध्ये आज सुद्धा वर्षभर कोणत्या ना कोणत्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन चालू असते .पेडगाव मध्ये असणाऱ्या ऐक्य भावाचे प्रतीक असणारे अनेक मंदिरे, मशिदी यांचे वैभव व थाट पाहून मोठे समाधान वाटते. या ठिकाणी ग्रामदैवत श्री भैरवनाथ यत्रोत्सव, ग्रामदैवत दुधारी बाबा उरूस, मारुती यात्रोत्सव, शंकर नगर खंडोबा यात्रा उत्सव, इत्यादी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतात .तेव्हा सुफी संत श्रीशहामुनी यांची जन्मभूमी देखील हेच श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव आहे याचा अनेक ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे . परंतु तरीसुद्धा सर्वांच्या विचारातून मोठ्या संशोधकांच्या भूमिकेतून जर ही गोष्ट सिद्ध झाली, त्यावर सर्वांचे एकमत झाले तर त्या शासन मान्यता देखील मिळू शकते. पेडगाव मध्ये होणाऱ्या यात्रोत्सवांमध्ये सुफी संत श्रीशहामुनी यांचा सुद्धा यात्रोत्सव पेडगावकर मोठ्या आनंदाने सुरू करतील. याबाबत शंका नाही. या ठिकाणी भविष्यात सुफी संत श्रीशहामुनी दर्गाह मंदिर ट्रस्ट पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ची निर्मिती झाल्या वाचून राहणार नाही. परंतु त्याआधी सुफी संत श्री शहामुनी यांची जन्मभूमी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव आहे याबाबत ग्रामस्थ ,सरकारी उच्च पदस्थ, जाणकार ,संशोधक व अभ्यासकांनी पावले उचलणे गरजेचे आहे. यांच्यामार्फत सूक्ष्म व उचित संशोधन व्हायला पाहिजे. त्यावर संगणमत निर्माण झाले पाहिजे. श्री शहा मुनी यांनी स्वतः सिद्धांत बोधात स्वतःच्या जन्मस्थळाबाबत केलेल्या वर्णनावर उपरोक्त सर्वांनी विचार करावा. महाराष्ट्रातील इतर दुसऱ्या कुठल्या ठिकाणास लागू पडते का ते पाहावे. तदनंतरच काय ती पावले उचलावीत. परंतु संशोधनाअंती श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव हीच श्री संत शहामनी यांची जन्मभूमी आहे ही गोष्ट सिद्ध झाल्यास व त्यास शासनमान्यता प्राप्त झाल्यास पेडगाव ची काय भूमिका असेल याबाबत एक ग्रामस्थ म्हणून मी या लेखामध्ये अभिव्यक्त झालो.

समारोप: लौकिक अर्थाने पाहता मी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी आहे. फक्त लहानपणी माझा श्री शहामुनी विरचित श्रीसिद्धांतबोध ग्रंथाशी संबंध आला. त्यामध्ये स्वतः शहामुनींनी त्यांच्या जन्मस्थानाबद्दल केलेल्या स्थल वर्णनाशी आपले गाव तंतोतंत जुळते आहे याचे मनात कुतूहल निर्माण झाले. पुढे त्यातून काही अंशी संशोधन घडले. मनात काही कल्पनाआल्या, संशोधनात्मक विचार कल्लोळ खळखळू लागला. या बाबत गावातील काही प्रतिष्ठितांशी संवादसाधला. परंतू प्रसार्माध्यामाखेरीज यास व्यापकतायेणार नाही म्हणून हा प्रयत्न. हेच सर्व या लेखाच्या माध्यमातून मी मांडले आहे. यावर ग्रामस्थ संशोधक व अभ्यासकांनी योग्य ते संशोधन व अभ्यास करावा असे लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो. आपल्या गावाशी स्थलनामसाधर्म्य असणारी जी माहिती माझ्या वाचनात आली ती इतरांना सांगावी या भूमिकेतून हा लेख लिहिला आणि शेवटी आपली मातृभूमी पेडगाव च्या इतिहासाच्या कुतूहलाने लेखणी हातात घेण्यास भाग पाडले.

संदर्भ सूची-
१) श्री शहामुनिविरचीत सिद्धांतबोध ओवी बद्ध ग्रंथ
२ ) श्री सिद्धातबोध कथासार - श्री संत शहा मूनी (मूल लेखक)
३) सिद्धांतबोध कथासार - मुळ लेखक: श्री. शहामुनी संपादक: श्रीकांत गोवंडे, सारथी प्रकाशन पुणे.
४) https://www.transliteral org ५ ) mr.quora.com एकनाथ वाघ- निवृत्त वायुसै- निक आणि वस्तु सेवा कर अधिकारी
६ ) m.facebook.com> groups > pests
७ ) www.discovermh.com) saint shahamuni
८ ) मुसलमान मराठी संतकवी- रा. चिं. ढेरे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे:
९ ) mahamarxist,blogspot.com-सौत्रांतिक मार्क्सवादी: शहागड आणि शहामुनी
१०) श्री नवनाथ भक्तिसार - श्री धुंडीसूत मालुकवी
११) पेडगावचा धर्मवीरगड एक ऐतिहासिक शौर्यतीर्थ - कृष्णा घोलप.
समाप्त

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.