समता, स्वातंत्र्य, न्याय प्रस्तापित करणारा शिवरायांच्या विचारांचा होणार जागर तालुकास्तरीय शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

By : Polticalface Team ,13-02-2023

समता, स्वातंत्र्य, न्याय प्रस्तापित करणारा शिवरायांच्या विचारांचा होणार जागर  तालुकास्तरीय शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन श्रीगोंदा :- शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य अशा सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते, माजी आ. राहुलदादा जगताप, नागवडे कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, महाराष्ट्र बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब नाहाटा, माजी जिल्हा बँक संचालक दत्तात्रय पानसरे, वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे, श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे, उपनगराध्यक्षा ज्योतीताई खेडकर तसेच सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन आणि तमाम शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा आयोजित दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्या. ६ वाजता शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा कार्यक्रम शनी चौक येथे होणार आहे. छत्रपती बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, श्रीगोंदा यांचे वतीने दि. १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा जोधपुर मारुती चौक येथे घेण्यात येणार आहे. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने कम्युनिटी हॉल येथे भव्य रांगोळी स्पर्धा दुपारी १२ ते ३ दरम्यात आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने खास महिलांची छत्रपती बाईक रॅली घेण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले सर्कल येथे दीपोत्सव करून अभिवादन करण्यात येणार आहे.

रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता शिवप्रतिमा पूजन आणि पालखी मिरवणूक श्रीगोंदा शहरातून निघणार आहे. या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा, माध्यमिकशाळा व महाविद्यालय यांच्या विविध पथकांचा सहभाग असणार आहे यामध्ये ढोल पथक, लेझीम पथक, झांज पथक, शिवकालीन शस्त्र विद्या, कराटे प्रात्यक्षिक इत्यादी पथके सहभागी होणार आहेत. सदरील पालखी जोधपुर मारुती चौक- दिल्ली येस, विजय चौक, बाजारतळ वेस, आण्णा भाऊ चौक, बसस्थानक, काळकाई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनी चौक असा असणार आहे. वेगवेगळ्या समाजाच्या वतीने ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. काळकाई चौक मित्र मंडळाचे वतीने शिवप्रतिमा पूजन, श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाणच्या वतीने - छत्रपती शिवाजी चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सायं. ४ वाजता जोधपुर मारुती चौक येथे इतिहास अभ्यासक व्याख्याते वैभव साळुंके यांचे शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर छत्रपती बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, श्रीगोंदा आयोजित गायन व नृत्य स्पर्धा असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा, भव्य रांगोळी स्पर्धा, गायन व नृत्य स्पर्धा यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून विजेत्यांची नावे घोषित करून त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. ६ ते ११ या वेळेत काळकाई चौक येथे लेझर शो काळकाई चोक मित्र मंडळाचे वतीने होणार आहे.

वरीलप्रमाणे शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा, छत्रपती बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, श्रीगोंदा, जिजाऊ ब्रिगेड श्रीगोंदा, काळकाई चौक मित्र मंडळ, आणि श्री. स्वयंभू युवा प्रतिष्ठाण श्रीगोंदा यांचे वतीने संयुक्त तालुकास्तरीय भव्य शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेसाठी आणि रक्तदान शिबिरासाठी शिवप्रेमींनी आपली नावे तातडीने नोंदवावीत तसेच वरील सर्व कार्यक्रमास तालुक्यातील सर्व मान्यवर नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा यांचे वतीने यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.