छत्रपती संभाजी महाराजांच्या "शौर्यस्थळास" आभिवादन करून छत्रपती संभाजीनगरकडे "राष्ट्रवादी राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा" मार्गस्थ
By : Polticalface Team ,14-02-2023
अ.नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव, तालुका श्रीगोंदा येथील ऐतिहासिक किल्ले पेडगाव वरील असणाऱ्या स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराजांच्या "शौर्यस्थळास" राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या वतीने मानवंदना देऊन अर्थान विनम्र अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित "राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा" स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री मा.शरदचंद्र जी पवार साहेबांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब, विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवार साहेब,खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली "राष्ट्रवादी राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा" सध्या अवघ्या महाराष्ट्रभर ३६ जिल्ह्यात प्रबोधनाचा उद्देश डोळ्यासमोर पुणे येथून दौऱ्यावर मार्गस्थ झाली आहे.
प्रबोधन यात्रेच्या नियोजित वेळापत्रकानुसार नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका दौऱ्यावर असताना ऐतिहासिक पेडगाव किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या "शौर्यस्थळास" सैनिकी पद्धतीने मानवंदना देऊन (अभिवादन करून ) छत्रपती संभाजी नगरकडे (औरांगाबाद) मार्गस्थ झाली.
याप्रसंगी पेडगावचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे गणपतराव शिर्के साहेब, प्रसिद्ध शाहू महाराज व्याख्याते व मुंबई उच्च न्यायालयाचे सिनियर मेडियटर ॲड. संभाजीराव मोहिते साहेब, राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थित होती. तसेच प्रदेश संघटक कॅप्टन वसंत अजमाने, प्रदेश चिटणीस श्रीमंत राठोड, शंभुसेनेचे लक्ष्मीकांत राजे शिर्के, लोहगाव विभाग प्रमुख चंद्रकांत गायकवाड, प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रकांत ढेंबरे, शंभुसेनेचे राज्य संपर्क प्रमुख श्यामजी देशकर, पेडगावचे माजी उपसरपंच देविदास काका शिर्के, संदीप देसाई, शाहजी जाधव, कॅप्टन विष्णू कोरे, गुंदप्पा साहेब, शिरीष पवार साहेब, राष्ट्रवादी महिला सैनिक विंगच्या सौ.राठोड मॅडम, यांच्यासह अन्य पदाधिकारी, शंभूभक्त मंडळी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जोरदार जयघोष करण्यात आला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी