लोणी व्यंकनाच्या या सुपत्रांना मिळाली महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी ग्रामस्थांकडून अभिनंदनचा वर्षाव

By : Polticalface Team ,14-02-2023

लोणी व्यंकनाच्या या सुपत्रांना मिळाली महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी ग्रामस्थांकडून अभिनंदनचा वर्षाव लिंपणगाव (प्रतिनिधी )-नुकत्याच राजस्थान जयपुर येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी लोणी गावातील ग्रामीण खेळाडूंना मिळाली. या विद्यालयाच्या खेळाडूंनी लोणी व्यंकनाथ गावाचे नाव राज्यात झळकवले. ग्रामस्थांनाही या खेळाडूंचा अभिमान वाटला ग्रामस्थांनी देखील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सन्मान करत अभिनंदन तोंड भरून कौतुक करत सन्मान केला या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळविले. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल विद्यालयात स्कूल कमिटीचे अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संचालक डी आर आबा काकडे, माजी संचालक विलासराव काकडे, पोलीस पाटील मनेश जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली मगर, श्री सुरेश लाटे, सोसायटीचे संचालक बंडोपंत खंडागळे या मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. चालू वर्षी घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात आयोजित गणित विज्ञान संघटनेने विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय सस्ते यांना कृतिशील शिक्षक म्हणून निवड केली. त्याबद्दल त्यांचा देखील यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावातील ग्रामस्थांनी व शाळेने या विद्यार्थ्यांसाठी 70 हजार रुपये मदत मदत दिली या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना खेळाचे भव्य मैदान व रात्रीचा सराव करण्यासाठी विजेची सोय ग्रामस्थांच्या मदतीने विद्यालयाने केली त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. व विद्यालयाला ग्रामस्थांच्या सदैव मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक तुषार नागवडे व या विद्यार्थ्यांना खेळासाठी भरीव मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक म्हणून गणेश काकडे, मंगेश कांबळे, सद्दाम इनामदार, ग्रामपंचायत सदस्य राहुल घोडके यांचाही यावेळी ग्रामस्थ व विद्यालयाने सन्मान केला. या सन्मान सोहळ्यास विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले. उपस्थित यांचे शिक्षक आनंदा पुराणे यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी