राजीव गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविले विशेष प्राविण्य
By : Polticalface Team ,14-02-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- राजीव गांधी विद्यालय चिखलठाण वाडी तालुका श्रीगोंदा येथील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस या परीक्षेत घवघवीत यश मिळवले मुख्याध्यापक श्री शरदराव उंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यामध्ये कुमारी शुभांगी रमेश गाजरे कुमारी माधुरी विजय जाधव कुमारी निकिता रामनाथ धुमाळ ओंकार दिलीप ढगे गणेश बंडू चिकलठाणे विशाल संतोष ढगे या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे संचालक श्री भाऊसाहेब नेटके, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर नेटके, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष श्री युवराज चिखलठाणे, ,मुख्याध्यापक शरदराव उंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री दिलीप देवी कर कु शब्दाली भापकर कु माधुरी गांगर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले या सर्व विद्यार्थ्यांचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन श्री राजेंद्र दादा नागवडे, व जिल्हा बँकेच्या संचालिका तथा ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सौ अनुराधाताई नागवडे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री बी के लगड सर यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :