एखाद्यानं(BBC) आपल्या विरोधात बातम्या लावल्या म्हणून त्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते?

By : Polticalface Team ,15-02-2023

 एखाद्यानं(BBC) आपल्या विरोधात बातम्या लावल्या म्हणून त्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? मुंबई : बीबीसी कार्यालयावर (BBC offices) आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारीवरून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) जोरदार हल्लाबोल केला आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं? असे प्रकार वेळीच रोखले नाही तर देशात हुकुमशाही येण्यास वेळ लागणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बीबीसीवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या इंडिया- द मोदी क्वेश्चन या माहितपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या माहितीपटातून गोध्रा हत्यांकाडादरम्यान, गुरजातचे तत्कालीन सीएम नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. अशातच बीबीसी कार्यालयावर आज आयकर विभागाने धाड टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रायगड मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बीबीसीच्या कार्यालयावर पडलेल्या धाडीवर देखील भाष्य केले आहे. यावेळी ठाकरे म्हणाले, लोकशाहीच्या ४ स्तंभात माध्यम हा महत्त्वाचा स्तंभ आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकली. एखाद्यानं आपल्या विरोधात बातम्या लावल्या म्हणून त्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? सरकारविरोधात बोलाल तर तो आवाज चिरडून टाकला जाईल, अशीच केंद्र सरकारची भूमिका असल्याचंही ठाकरे म्हणाले. ते म्हणाले, आम्ही वाटेल ते करू पण तुम्ही आवाज उचलायचा नाही. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही पाशवी वृत्ती आज आपल्या देशात फोफावायला बघतेय. ही आपण वेळेवर एकत्र आलो नाहीत आणि ताकद वाढवली नाही तर संपूर्ण देश खाऊन टाकेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. दरम्यान, गुलामगिरी ती गुलामगिरीच असते मग ती स्वकीयांची असेल परकीयांची असेल. भारत माता पुन्हा माझी गुलाम कशी होईल, या दिशेने त्यांची जी पावलं चालली आहेत ती पावलं वेळेत ओळखून आपल्याला एकत्र यायला पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.