उत्तुंग यशासाठी स्वप्नांना प्रयत्नांची जोड द्या - गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे

By : Polticalface Team ,17-02-2023

उत्तुंग यशासाठी स्वप्नांना प्रयत्नांची जोड द्या - गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे लिंपणगाव (प्रतिनिधी)-- आयुष्यात जर उत्तुंग यश गाठायचे असेल तर स्वप्नांना तितक्याच कठोर परिश्रमांची जोड देण्याबरोबरच आपल्या परिस्थितीचं भान असण आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिवाजीराव नागवडे डेफोडील्स स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे यांनी व्यक्त केले.

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, दुय्यम निबंधक सचिन खताळ, तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण, निरीक्षक एस.पी.गोलांडे, मुख्याध्यापिका दुलानी मॅडम आदी उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रशांत दरेकर यांनी वेगवेगळे उदाहरण देत जिद्द, त्याग आणि कठोर परिश्रम हीच यशाची त्रिसूत्री असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जीवन जगत असताना अपयश जरी आले तरी न थांबता यशासाठी प्रयत्न करत रहा, कारण कुठलेही यश अंतिम नसते आणि यशाला शेवटही नसतो असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी केवळ गुणात्मक स्पर्धा करण्याऐवजी स्वतःतील क्षमता ओळखून भविष्यातील यशाच्या वाटा निवडाव्यात असे मत दुय्यम निबंधक सचिन खताळ यांनी मांडले.तर जीवनामध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान आणि जगामध्ये चाललेल्या इतर घडामोडी यांचे देखील ज्ञान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पत्रकार विशाल चव्हाण यांनी मांडले.

करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे ज्ञान प्राप्त व्हावे, प्रशासकीय अधिकाऱ्यांची यशोगाथा ऐकायला मिळावी यासाठी प्रशासकीय, कृषी, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना समारंभास आमंत्रित केल्याचे निरीक्षक एस पी गोलांडे यांनी सांगितले.

यावेळी दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त करत यशस्वी होण्यासाठी दिलेल्या शैक्षणिक शिदोरीबद्दल शिक्षकांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा व मयंक मुथा यांच्यासह इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक प्रियंका नागवडे यांनी तर आभार प्रदर्शन शुभ्रा सारंगकर या विद्यार्थिनींनी केली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष