वंचित बहुजन युवा आघाडीने करमाळा शहरातील विविध प्रश्नाकडे उपोषणाच्या माध्यमातून लक्ष वेधताच नगरपालिका प्रशासनाने केल्या मागण्या पूर्ण
By : Polticalface Team ,18-02-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील विविध मागण्यांच्या संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करमाळा नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते अखेर या उपोषणाला यश आले असून स्वतः करमळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोंढे यांनी सदर उपोषणाकडे वेळीच लक्ष देऊन उपोषणकर्त्यांचे सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासनानंतर अखेर युवा आघाडीने आपले उपोषण मागे घेतले आहे वंचित बहुजन युवा आघाडी च्या करमाळा नगर परिषद येथे झालेल्या ऐक दिवसीय उपोषण शहरातील विविध भागातील वॉर्ड क्रमांक 1 ते 6 मधील स्वच्छता, स्वच्छतागृह ,गटार सफाई, पाणी पुरवठा सुरळीत, मोकाट जनावर बंदोबस्त, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मागणीला यश मिळाले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष ÷अभिमान जगताप
जिल्हा उपाध्यक्ष ÷सुभाष बापू ओहोळ
जिल्हा महा सचिव युवा ÷नितीन सरवदे माजी जिल्हाध्यक्ष ÷गोपाळ देशमुख उपस्थित राहून उपोषण करून वंचित बहुजन युवा आघाडी करमाळा शहर तालुक्यांत जिल्ह्य़ातील सर्व गावं ठिकाणी ताकत निर्माण करून संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले.तसेच इतर अनेक राजकीय पक्ष. सामाजिक संघटना. वंचित समाज सहभाग घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी ताकत देऊन करमाळा नगर परिषद मुख्याधिकारी. मा.बालाजी लोंढे साहेब. सर्व कर्मचारी शहर ठिकाणी वेळो वेळी सहकार्य करणार असे निवेदनात लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली वंचित बहुजन आघाडी या संघटनेने यापूर्वी विविध प्रश्नासाठी आवाज उठविला होता त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आल्याने करमाळा शहरातील नागरिक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विशेष धन्यवाद देत आहे.
वाचक क्रमांक :