लिंपणगावच्या श्री सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव

By : Polticalface Team ,18-02-2023

लिंपणगावच्या श्री सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव लिंपणगाव प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव महाशिवरात्रीपासून प्रारंभ होत आहे. यावेळी गावात तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गावच्या यात्रा कमिटीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या प्रमुखां कडून देण्यात आली आहे. दरम्यान यात्रा कमिटीने दिलेल्या माहितीनुसार प्रथम महाशिवरात्री दिवशी पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेक भक्त श्री सिद्धेश्वर महाराजांना पहाटेपासूनच महाअभिषेक घालून नतमस्तक होतात. महाशिवरात्रीच्या सायंकाळी 9 ते 11 जेष्ठ कीर्तनकार सुसेन महाराज नाईकवाडे बीड यांचे शिवरात्री महोत्सवावर हरिकीर्तन होणार आहे. प्रामुख्याने यात्रेचा दुसरा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस समजला जातो. या दिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला दंडवत घेऊन सकाळी सात वाजलेपासून श्री सिद्धेश्वर महाराजांना वाजत गाजत शेरनी वाटप करतात. दरम्यान त्याच रात्री आठ ते अकरा या वेळेत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा मांडगे महाराज यांच्या अधिपत्याखाली पंचक्रोशीतील भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात गावातून वाजत गाजत मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सोहळ्या दरम्यान शोभेचे दारू काम हे डोळ्याचे पारणे फेडावे असे असणार आहे. पालखीचे मंदिरात विसर्जन झाल्यानंतर सविता राणी पुणेकर यांचा बहुरंगी लोकनाट्याचा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी पुन्हा सविताराणी पुणेकर यांचा लोकनाट्याचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी मल्लांसाठी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे. तर त्याचं रात्री आठ ते साडेअकरा या दरम्यान मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. यात्रा सुरक्षित व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. या यात्रेच्या तीन दिवशी कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच हे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार असून, यात्रा कमिटीचे अन्य कार्यकर्ते हे सदस्य म्हणून कामकाज पाहणार आहे. भाविक भक्तांना श्री सिद्धेश्वराची विधिवत पूजा करण्यासाठी ज्येष्ठविधीतज्ञ सुधीर कुलकर्णी व मंदिराचे पुजारी शिवप्रसाद गुरव हे प्रयत्नशील आहे. तालुक्यातील भाविक भक्तांनी या ग्रामदैवताच्या उत्सवाचा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी