सिंहगड लोणावळा संकुलामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एअर मार्शल गरुड यांचे प्रेरणादायी व्याखान
By : Polticalface Team ,18-02-2023
कुसगाव (बु) १६फेब्रु.,२०२३
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी लोणावळा यांनी दि. १६फेब्रु.,२०२३रोजी करियर कौन्सिलन सेंटर च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एअरमार्शल अरुण गरुड यांचे व्याख्यान आयोजित केले होते.या व्याख्यानात सरांनी त्यांच्या आयुष्यातील वाटचालीची माहिती विद्यार्थ्याना दिली .वयाच्या १५ व्या वर्षी आठवीत असताना त्याच्या स्वप्नांना कलाटणी मिळाली. विद्यार्थ्यां मध्ये नेतृत्व कौशल्य असायला हवे, वेळोवेळी कौशल्य विकास करून स्पर्धा परीक्षा देत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याची माहिती दिली. सरांनी रामदास स्वामी रचित कविता "शिवरायांचे आठवावे रूप" माध्यमातून शिवराय आणि त्यांचे कार्य याची महती सांगितली. विद्यार्थांना प्रोत्साहित केले. आपली जीवन कहाणी सांगत आतापर्यंतचा प्रवासाची चित्रफित दाखविली. गरुड यांना वायुसेना पदक १९९६, परम विशिष्ट्य सेवा पदक २०१५ साली मिळाले. विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद जागी केली. हाती आलेल्या कार्यामध्ये सातत्य आणि कठीण परिश्रम करायची इच्छा असणारा विदयार्थी ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचतोच असे सांगितले. या व्याख्यानावेळेस सिंहगड संकुलाचे संचालक डॉ. एम.एस. गायकवाड तसेच संस्थेतील प्राचार्य डॉ.प्रदीप नलावडे, डॉ. जयवंत देसाई, प्रा. पार्थ नाथ, तसेच एकशे पन्नास विद्यार्थी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :