महाशिवरात्रीनिमित्त लिंपणगाव मध्ये भाविकांची मांदियाळ यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी सज्ज

By : Polticalface Team ,18-02-2023

महाशिवरात्रीनिमित्त लिंपणगाव मध्ये भाविकांची मांदियाळ
यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी सज्ज

लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री पासून सलग तीन दिवस यात्रा उत्सव प्रारंभ झाला आहे. महाशिवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविक भक्तांनी व आबालावृद्धांनी श्री सिद्धेश्वर महाराजांना महाअभिषेक घालण्यासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेतले .श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त श्री सिद्धेश्वर महाराजांना पहाटेपासूनच महाअभिषेक घालण्यासाठी तोबा गर्दी केली होती. गावचे ग्रामदैवत हे भाविक भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. अनेकांच्या वर्षभरातील स्वप्नपूर्तीची इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्यामुळे आवर्जून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दूरवरून भाविक भक्त सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. दरम्यान महाशिवरात्री निमित्त लिंपणगावमध्ये सलग तीन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यात्रा कमिटीने आयोजित केल्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्तात भाविकांना शांततेत दर्शन घेण्यासाठी यात्रा कमिटीने नियोजन केले आहे. श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी मंदिरात येऊन श्री सिद्धेश्वर महाराजांना महाअभिषेक घातला. चालू वर्षी मंदिरात भाविकांना शांततेत दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या प्रांगणात ज्येष्ठविधीतज्ञ व भाविकांना भव्य मंडप उभारून त्या मंदिरामध्ये एकाच वेळी जवळपास 25 ते 30 भाविकांना महाभिषेक घालण्याची मोठी सोय करून दिल्याने भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान लिंपणगावचा विस्तार हा जवळपास सहा वाड्या व गाव मिळून असा असल्याने गावची लोकसंख्या जवळपास 15 ते 16 हजारा दरम्यान असून, यात्रेनिमित्त सर्व वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ एकत्र येत यात्रा वर्गणी व इतर धार्मिक कार्यक्रमात मोठा सहभाग नोंदवतात. यात्रा कमिटीने योग्य नियोजन करत तालुक्यात लिंपणगावची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा ही आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी होताना दिसते. यात्रेनिमित्त मंदिरावर मोठी आकर्षक अशी डोळ्याचे पारने फेडावे अशाप्रकारे विद्युत रोषनाही देखील करण्यात आलेले असून, यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आखाड्याच्या कार्यक्रमानिमित्त मल्लांसाठी लाल माती टाकून मैदान सुसज्ज करण्यात आले आहे. दूरवरून मल्ल या आखाड्यात सहभाग होतात. त्यावेळी विजत्यांना मोठी बिदागी दिली जाते. दरम्यान यात्रेनिमित्त व्यवसायिकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मंदिरा सभोवताली सुसज्ज जागा देखील उपलब्ध करून देण्यात आल्याने व्यावसायिकांनी देखील यात्रा कमिटीचे कौतुक केले आहे. यात्रेचे प्रमुख म्हणून सरपंच शुभांगीताई जंगले तर उपप्रमुख म्हणून उपसरपंच अरविंद कुरुमकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच काही निवडक गाववाड्यातील कार्यकर्ते हे सदस्य म्हणून सहभाग नोंदवतात. महा अभिषेकासाठी विधीतज्ञ सुधीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे पुजारी शिवप्रसाद गुरव व सौरभ गुरव यांनी भावी भक्तांना सहकार्य करीत आहेत. यात्रा सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य अनुचित प्रकार घडू नये म्हणून बारीक लक्ष ठेवून आहेत. तर बंदोबस्त कामी श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री बडे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर व भांडलकर हे लक्ष ठेवून आहेत.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न