दौंड तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार संजय पाटील यांना शेतकऱ्यांचे थकित विज बिल माफ करा, रासपचा आंदोलनाचा इशारा

By : Polticalface Team ,20-02-2023

दौंड तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार संजय पाटील यांना शेतकऱ्यांचे थकित विज बिल माफ करा, रासपचा आंदोलनाचा इशारा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २० फेब्रुवारी २०२३, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोरोणा लॉकडाऊन काळातील थकित वीज बिल माफ व्हावे व शेतकऱ्यांना तात्काळ नियमित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा,तसेच दिवसा बारा तास वीज शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी (रासप) राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दौंड तालुका विधानसभा अध्यक्ष दादासाहेब ठकाराम भिसे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दौंड तहसीलदार मा संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रसंगी दौंड तालुका विधानसभा अध्यक्ष दादासाहेब ठकाराम भिसे यांच्या उपस्थितीत अभिजित कोकरे, प्रशांत रुपनवर, गणेश भोसले,किरण सुळ, प्रामुख्याने उपस्थित होते.

दौंड तालुका व राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे,असलेल्या पिकाला योग्य बाजार भाव मिळत नाही, रात्रपाळीत वीज असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करावी लागत आहे, जनावरांचा चारा देखिल शेतातुन उपलब्ध करणे मुश्किल झाले आहे अशा परस्तितीत महावितरण विद्युत विभागाची कारवाई व नियमित बिला वरील सावकारी व्याज दर शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवली जात आहे. वीज बिला पेक्षा अधिक त्यावरील व्याजाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, महावितरण विद्युत वितरण कंपनी सावकारी करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे, पुर्वी तीन महिन्यांत १५० ते २५० रु वीज बिल सर्व सामान्य कुटुंबाला येत होते आता मात्र महिन्याला दिड ते दोन हजार रुपये वीज बिल येत आहे, महावितरण विद्युत कंपनी सर्व सामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची कसुन व ऊसा प्रमाणे पिळवणूक करत असल्याची तालुक्यातील शेतकऱ्यांची भावना निर्माण झाल्या आहेत, राज्यातील व तालुक्यातील शेतकरी अडचणीत असताना महावितरण विद्युत विभागाची सावकारी प्रमाणे वसुली सर्व सामान्य माणसाला हैराण करु लागली आहे, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील रोजंदारी कामगार शेतमजूर आणि व्यापुन गेलेला शेतकरी वैतागून गेला आहे.

त्यामुळे दौंड तालुका महावितरण विद्युत विभाग व राज्यातील वरीष्ठ अधिकारी यांनी शेतकऱ्यांना नियमित बिला वरील लावलेला व्याजाचा सावकारी दर लाऊ नये, तसेच कोरोणा लॉकडाऊन काळातील वीज बिल माफी देण्यात यावी, देशातील कायद्यानुसार सावकारी करणे बंधनकारक असताना देखील महावितरण कंपनी पठाणी व्याज लाऊन नागरिकांन कडुन वसुली करत आहेत. या संदर्भात तात्काळ बदल करण्यात यावा शेतकऱ्यांना वीज बिल भरणा करण्यासाठी दोन तीन हप्ता करुन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अंन्यथा दौंड तालुका (रासप) राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दौंड तालुका तहसील कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालय आणि महावितरण विद्युत कार्यालय येथे मोर्चा काढून जन आंदोलन करण्यात येईल पुढील होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार असेल याची तात्काळ दखल घेऊन समाधान कारक निर्णय घेण्यात यावा, असे दौंड (रासप) राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी