पंचायत समितीच्या गलथान कारभाराविरुद्ध राजेंद्र म्हस्के यांचे धरणे आंदोलन.

By : Polticalface Team ,21-02-2023

पंचायत समितीच्या गलथान कारभाराविरुद्ध राजेंद्र म्हस्के यांचे धरणे आंदोलन. श्रीगोंदा प्रतिनिधी दि- २१ फेब्रुवारी २०२३ श्रीगोंदा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कामांची व गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी.जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यात अनेक गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे परंतू काही गावांमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठ्याचे काम झाले व ती योजना अद्याप सुरू नाही.तरी जुन्या योजना पूर्ण होईपर्यंत नवीन कामांना सुरुवात करू नये.तसेच गाय गोठा प्रकरणात लोकांची अडवणूक व पिळवणूक होत आहे ती थांबवावी.तसेच अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे कामे करत आहेत.या कामांची तपासणी करूनच बिले अदा करावीत.या व इतर काही मागण्यांसाठी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलत असताना राजेंद्र म्हस्के म्हणाले की,सध्या प्रशासकीय कारभार चालू आहे.त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात अंधाधुंदी कारभार चालू आहे.बांधकाम विभागात बोगस एमबी रेकॉर्ड करून बिले अदा केली जात आहेत.ठेकेदार व संबंधित शाखा अधिकारी संगणमताने निधी लुटण्याचे काम करत आहेत.गाय-गोठा प्रकरणे जाणीवपूर्वक आर्थिक लाभासाठी अडवले जात आहेत.पंचायत समितीशी निगडित कामांसाठी लोकांना एका कामासाठी दहाबारा हेलपाटे मारावे लागतात.प्रशाकीय कारभारामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे.जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत असे त्यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ बोलत असताना म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे कोणत्याच कामाला दर्जा राहिला नाही.दलित वस्तीसाठी आलेला निधी दलित वस्तीत खर्च होत नाही.पंचायत समिती मधील अधिकारी प्रत्येक कामात आर्थिक तडजोड करताना दिसत आहेत.हे कुठं तरी थांबलं पाहिजे असे ते म्हणाले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राम जगताप यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. गटविकास अधिकारी बोलत असताना म्हणाले की, आंदोलनातील प्रमुख मागण्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकी घेतली आहे.ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत व गैरव्यवहार झाला असेल त्या ठिकाणी चौकशी करू व कारवाई करू असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अनिलराव ठवाळ, राम घोडके, शिवप्रसाद उबाळे, दत्तात्रय दांगडे, प्रमोद म्हस्के, महादेव म्हस्के मनोज शिंदे,माऊली माटे,अजिनाथ कळमकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. चौकट:- "जलजीवन मिशन" योजना हि "पैसे कमाव मिशन" योजना..!! - राजेंद्र म्हस्के(मा.पं.समिती सदस्य) तालुक्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. परंतु पूर्वीच कोट्यावधी रूपये खर्च करून केलेली योजना सुरळीत चालू नाही.लोकांना त्याचा लाभ मिळत नाही.वेळेवर पाणी मिळत नाही म्हणून लोक पाणीपट्टी भरत नाहीत.मग आता येणारी वाढीव पाणी पट्टी कशी भरतील.हे सर्व सामान्य कुटुंबासाठी शक्य नाही.हि योजना केवळ ठेकेदार व अधिकारी यांच्या फायद्याची आहे.असे म्हस्के म्हणाले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष