राष्ट्रवादी आयोजित राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून जोरदार स्वागत

By : Polticalface Team ,21-02-2023

राष्ट्रवादी आयोजित राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून जोरदार स्वागत बुलढाणा : (प्रतिनिधी): आदरणीय खा.पवार साहेबांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेब, माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. अजित दादा पवार साहेब तसेच सुप्रिया ताई यांच्या मार्गदर्शनाखाली "राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा" सुरू आहे. यात्रा ३६ जिल्ह्यात अंदाजे १२५ ते १५० तालुक्यांमध्ये जाणार असून, प्रत्येक दिवशी किमान २/३ प्रबोधन सभा होतील. यात्रेची सुरूवात आदरणीय अजितदादांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी पक्षाचा ध्वज दाखवून पुणे येथून १० फेब्रुवारी रोजी १०:१० प्रारंभ करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील भव्य सैनिक संमेलनास माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेबांनी सैनिकांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. सैनिक हा नेहमीच देशहिताचे काम करतो म्हणून आम्हालाच काय अवघ्या भारत देशाला अभिमान वाटत असल्याचे आमदार शिंगणे साहेबांनी आपले मत व्यक्त केले. लोकशाही निव्वळ नावापुरती राहिली आहे, सरकारच्या विरोधात आपल्याला बोलणे अवघड झाले आहे.घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून लोकांची तोंडे बंद केली जात आहेत, सध्या कोणालाही निष्पक्ष, निर्भिडपणे बोलण्याचा किंवा विचार मांडण्याचा अधिकार राहिलेला नाही. महापुरुषांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, छ. शिवराय, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचे विचार पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व बळकटीसाठी महा पुरूषांचे विचार महाराष्ट्रातील तळा गळातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी रा. कॉ.पार्टी माजी सैनिक सेलच्या माध्यमातून महाप्रबोधन यात्रेची सुरूवात करण्यात झाली. आदरणीय पवार साहेब, 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी व केंद्रीय संरक्षण मंत्री असताना जनसामान्यांचे, शेतकरी व सैनिकांचे हित जोपासण्याचे काम केले आणि खऱ्या अर्थाने "जय जवान, जय किसान" चा नारा बुलंद करून न्याय दिला. ज्या राज्यात व देशात जवान व शेतकरी सुखी समाधानी असतो तेच राज्य खऱ्या अर्थाने प्रगती करू शकते किंवा चांगल्या प्रकारे चालते. म्हणून हा विचार करून शेतकरी आणि सैनिकांचे हित आदरणीय पवार साहेबांनी जपण्याचे काम केले असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल चे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के यांनी व्यक्त केले. आजपर्यंत सैनिकांना राजकारणात स्थान नव्हते, परंतु आदरणीय पवार साहेबांनी सैनिकांना १४ एप्रिल २२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्न माजी सैनिक सेलची स्थापना करून राजकीय प्रवाहात सामील करून घेत,माजी सैनिकांना राजकारणात संधी दिल्याबद्दल सैनिकांनी आभार व्यक्त केले. *आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने छ.शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जपण्याचे काम केला. राष्ट्रवादी हा पक्ष आदर्श महापुरुषांचे विचार जपणारा असल्याने त्याला आणखी बळकट करण्याच्या हेतूने आम्ही सर्व माजी सैनिक मंडळी काम करत आहोत असे ही राजे शिर्के मत व्यक्त केले. आदरणीय पवार साहेबांचे पुरोगामी, सर्व समावेशक विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील लाखो सैनिकांना एकत्र करून एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सध्याचे राज्य व केंद्र सरकार सैनिक व शेतकऱ्याची फक्त दिशाभूल करताना दिसत आहेत असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी प्रसिद्ध प्रबोधनकार, राजश्री छ. शाहू महाराज इतिहासकार लेखक ॲड. संभाजी मोहिते, यांनी लोकराजा छ. शाहू महाराज यांचे विचार लोकशाही साठी कसे महत्वाचे आहेत यावर मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक राजे शिर्के, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ॲड. नाझिर काझी, सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष राजे प्रभाकर देशमुख, तालुकाध्यक्ष जगन्नाथ वाघ, महिला जिल्हाध्यक्ष खेडकर.ताई आदीसह सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.