सिंहगड लोणावळ्याच्या विद्यार्थ्यांच्या आयोजनांमधून साकारला भव्य शिवजन्मोत्सव सोहळा

By : Polticalface Team ,21-02-2023

सिंहगड लोणावळ्याच्या विद्यार्थ्यांच्या आयोजनांमधून साकारला भव्य शिवजन्मोत्सव सोहळा कुसगाव (बु)फेब्रुवारी,२०२३ मराठी मुलखामधील मराठी अस्मितेचा सण म्हणून शिवजन्मोत्सवाची ओळख निर्माण झाली आहे. जगप्रसिद्ध पराक्रमी राजा, युद्धनीतीज्ञ, व्यवस्थापन तज्ञ अशा विविध उपाधी छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्या जातात. करोना काळानंतर पहिल्यांदाच साजरा होत असलेल्या शिवजन्मोत्सव -२०२३ सोहळ्याचे सर्व नियोजन सिंहगड संकुलामधील विद्यार्थ्यांनी केलेले होते. सायंकाळी ५ वाजण्याचे सुमारास अंफिथिएटर मधील सभा मंचावर प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते सुशील काळंगे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळेस कु. थोरात, कदम, सोनवणे यांनी शिवजन्म शिवपराक्रम याविषयी स्वतःचे मनोगत खड्या आवाजात व्यक्त केले. ढोल पथकाने भगवा पताका उंच नाचवून नयनरम्य दृश्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर प्रमुख पाहुणे काळंगे यांनी शिवचरित्रा विषयीचे व्याख्यान अतिशय प्रभावीपणे मांडनी करून प्रेक्षकांना दीड तासाहून अधिक वेळ खुर्चीबरोबर खिळवून ठेवले. हिरोजी इंदुलकर, शिवा काशिद, बाजी प्रभु देशपांडे यांची उदाहरणे देऊन त्यामधून युवा पिढीसाठी काय संदेश घेता येतो याचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीने उत्कर्षाने मांडले. आजच्या तरुण पिढीने काय करावे, शिवजन्मोत्सव का? , गड दुर्गांची स्वच्छता राखण्याविषयी कळकळीचे आवाहन केले.तरुणांनी काय करू नये, व्यसनाधीनता याविषयी समर्पकपणे आपले विचार व्यक्त केले. शेवटी आपल्या पराक्रमी राजाच्या कनवाळूपणाची उदाहरणे देऊन व्याख्यानाची सांगता केली. कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे विद्यार्थी आयोजित शिवकल्याण राजा महानाट्य यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला सादर करताना शिवजन्म,अफजलखान वध, शिवराज्याभिषेक अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा हुबेहूब देखावा महानाट्याच्या स्वरूपामध्ये सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. या कार्यक्रम प्रसंगी संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख वस्तीग्रह प्रमुख, प्राचार्य, संचालक, सुरक्षा व इस्टेट अधिकारी सर्वजण उपस्थित होते. विशेष म्हणजे हजारोच्या संख्येने हजर असणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीने हा कार्यक्रम सुखद आनंद देणारा ठरला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.