छत्रपती शिवाजी कॉलेजला नॅक बेंगलोर चे A+ मानांकन.
संस्थेतील सेवकांत जल्लोष आणि आनंद.
By : Polticalface Team ,21-02-2023
श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेची (नॅक) ‘A+’ श्रेणीसह ३.३८ गुण मिळाले आहेत. तृतीय ‘सायकल’मध्ये ही उच्च श्रेणी प्राप्त करणारे छत्रपती महाविद्यालय अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव महाविद्यालय ठरल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे महाविद्यालयात पुढील काळात विविध नवीन कोर्सेस सुरू केले जाणार आहेत तसेच सुसज्ज मैदान, स्मार्टबोर्ड ,विविध आस्थापना सोबत सामंजस्य करार आणि कॅम्पस ड्राईव्ह यामुळे विद्यार्थ्यांना देशातील विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी म्हणाले, नॅकच्या माध्यमातून देशपातळीवर उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची गुणवत्ता (मूल्यमापन) तपासली जाते. माजी कुलगुरू डॉ.दिपक मंडल (पश्चिम बंगाल), प्रोफेसर डॉ.जगृपसिंग सेखॉंन (पंजाब), प्राचार्य डॉ.जयेश पुजारा (गुजरात) या ‘नॅक’च्या तज्ज्ञ समितीने १६ व १७ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती महाविद्यालयास भेट देऊन गेल्या पाच वर्षांची महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेची पाहणी केली होती. त्यानंतर ‘नॅक’ने नुकतेच गुणांकन जाहीर केले. त्यात महाविद्यालयास तृतीय ‘सायकल’मध्ये ‘A+’ हा ‘ग्रेड’ मिळाला असून महाविद्यालयाचा CGPA ३.३८ एवढा आला आहे. या मानांकनामुळे अनेक फायदे होणार आहेत. शहरातील नामांकित आणि नॅक A+ दर्जाप्राप्त महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी फायदा होईल.संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्थ मंडळ यांच्या सहकार्याने कॉलेजमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध झालेल्या होत्या.
महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, मूल्यांकन, संशोधन, विस्तार कार्य, मूलभूत सुविधा व विद्यार्थी साह्य व प्रगती, प्रशासकीय नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य व नावीन्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करून ‘नॅक’ समितीने हा दर्जा बहाल केला आहे.
या यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, सौ. अनुराधाताई नागवडे, दिपकशेठ नागवडे, संस्थेचे सेक्रेटरी, निरीक्षक सचिनराव लगड आणि सर्व विश्वस्थ यांनी प्राचार्य,‘नॅक’ समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक, क्रयटेरिया प्रमुख व सदस्य, विविध कमिटी प्रमुख व सदस्य,तसेच शिक्षकेतर कर्मचारी व कनिष्ठ विभागातील सर्व सहकारी वृंदाचे अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.